अंधश्रद्धा वर मराठी निबंध | Andhashraddha Essay in Marathi

 अंधश्रद्धा वर मराठी निबंध | Andhashraddha Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अंधश्रद्धा मराठी निबंध बघणार आहोत. आजचे युग विज्ञान व संगणकाचे युग आहे. मानवाने चंद्रावर विजय प्राप्त केला आहे. लवकरच तो दुसऱ्या ग्रहांवरही जाऊ शकेल. वाहतूक आणि संचाराच्या आधुनिक साधनांनी संपूर्ण जगाला एका क्वि ग्रामात रूपांतरित केले आहे. असे असले तरी मानव अंधविश्वासूच आहे. 


त्याचा आजही मंत्र तंत्र जादू टोण्यावर, शकुना-अपशकुनांवर विश्वास आहे. जसा शंभर वर्षांपूर्वी त्याच्या पूर्वजांचा होता. कुठेही कोणतेही वास्तविक, मानसिक आणि सामाजिक परिवर्तन या संदर्भात पाहावयास मिळत नाही, याबाबतीत अविकसित व विकासशील देशांची स्थिती आणखीनच वाईट आहे. 


रोज एखाद्या स्त्रीला भुतीण ठरवून मारले जाते किंवा तिला यातना दिल्या जातात. प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी पुजारी, पंडे बडवे आणि तांत्रिकाचा सल्ला घेतला जातो. तांत्रिक, मांत्रिक, पंडे, पुजारी, ज्योतिषी, बुवा आणि देवांचा जणू पूर आला आहे. 


रोज कुणी ना कुणी नवा योगेश्वर, स्वामी, भगवान उगवतात. आधुनिक युगातही लोक आपल्या संकटातून मुक्त होण्यासाठी ग्रह-नक्षत्रांवर अवलंबून राहतात आणि फसवेगिरी करणाऱ्या तांत्रिक, मांत्रिकांच्या आहारी जातात. ही मोठी नवलाची गोष्ट आहे.


अंधविश्वासाचे मूळ कारण आहे अशिक्षितपणा. अंधविश्वासाबरोबरच वाईट रूढी, गरिबी, मागासलेपणा, कुप्रथा, धर्मांधता इत्यादी गोष्टीही उत्पन्न होतात. भारतात शिक्षणाची पातळी खूपच खाली आहे. एकूण लोकसंख्येपैकी बरीच लोकसंख्या आजही निरक्षर, अडाणी असून अंधविश्वासू आहे. 


आवश्यक असणारे प्राथमिक शिक्षण मोफत आणि सर्वांना सुलभ करण्याचे स्वप्न आजही साकार झालेले नाही. स्वातंत्र्य मिळून ५८ वर्षे झाली तरी अशिक्षितपणा, बेकारी, उपासमार, अज्ञान आणि अंधविश्वासाचे राज्य आहे. पशुंना बळी देणे सामान्य गोष्ट आहे. 


नरबळीच्या बातम्याही वृत्तपत्रांत वाचावयास मिळतात. भूत-प्रेत पळविण्यासाठी, क्रुद्ध देवता, ग्रहांना संतुष्ट करण्यासाठी जघन्य कृत्ये केली जातात. वृक्ष आणि दगडांची पूजा, ताईत घालणे, शकुन विचारणे, अज्ञात आणि अनामिक शक्तींना घाबरणे, स्वप्नांवर विश्वास ही काही अंधविश्वासाची उदाहरणे होत.


सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, धूमकेतू दिसणे, तारे तुटताना दिसणे यामुळे आजही लोक भयभीत होतात. कामाला जाताना मांजर आडवी गेली तर अपशकुन समजतात. जर ती मांजर काळी असेल तर संकटाचा पहाडच कोसळेल असे मानतात. 


कुणाचे शिंकणे, घुबडाचा घुत्कार, गाढवाचे ओरडणे. कुत्र्याचे कान फडफडविणे, मांजरीचे रडणे, गिधाडाचे ओरडणे अपशकुनी समजतात व लोक त्याला घाबरतात. यापासून मुक्ती मिळविण्यासाठी अनेक प्रकारची मूर्खपणाची कृत्ये केली जातात. ज्याचा फायदा समाजातील धूर्त लोक घेतात. दुर्दैव, असुरक्षितता, अज्ञात आणि प्रतिकूल शक्तींची लोकांना सतत भीती वाटत राहते. 


हे सर्व आपले अज्ञान, अशिक्षितपणा, मानसिक विकृती आणि संकुचित विचारांच्या परिणामामुळे घडते. जेव्हा एखाद्या घटनेची कारणे, परिणाम आपल्याला समजू शकत नाहीत तेव्हा आपण त्याला रहस्यमय दैवी आणि अनैसर्गिक, अमानवी समजून घाबरतो. 


त्याचा फायदा घेऊन तांत्रिक, मांत्रिक, पुजारी सहजपणे आपला स्वार्थ साधून घेतात व पैसा कमावतात. अशा प्रकारे शोषण, अंधक्विास आणि कुरीतींचे एक असे मायाजाल बनते की त्यापासून मुक्ती होणे असंभवच.अज्ञान आणि शास्त्रीय विचारांचा अभाव हे अंधविश्वासाचे जनक आहेत. वाईट चाली, अशिक्षितपणा, अफवा इकडून पोषण झाल्यामुळे ते अधिक भयावह बनते. 


अशा अविवेकी आणि मूर्खपणाच्या वातावरणात हस्तरेखा ज्ञान, ज्योतिष, भविष्यदर्शन, चमत्कार आणि जादूच्या नावावर लोकांना फसविणे फार सोपे असते. कारण लोकांची विचार शक्ती कुंठित होते आणि म्हणून ते योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे व्यक्तीचे पतन होते आणि सामाजिक विकास थांबतो. 


अंधक्विास व्यक्तीच्या मनोबलाचा आणि आत्मविश्वासाचा विनाश करून त्याला पंगु, नपुंसक, भित्रा बनवितो. अशा व्यतीकडून कोणत्याही चांगल्या प्रशंसनीय कार्याची आशा करता येत नाही. तो देश समाज कुटुंबासाठी ओझे बनतो.


भय हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. भयाचे मूळ आहे अशिक्षितपणा आणि अंधविश्वास भयभीत व्यक्तीची स्वत:ची काही इच्छा नसते. दुसरे लोक त्याच्याशी पशुवत व्यवहार करतात. भूत, प्रेत, मृत व्यक्ती, ग्रह नक्षत्रांची पूजा यांच्या चक्रात पडून माणूस चक्रावून जातो. त्याचा ना वर्तमानकाळ असतो ना भविष्यकाळ. 


अंधविश्वासामुळेच धर्माच्या नावावर लोक संकुचित विचारांचे, असहिष्णु, हिंसक, धर्मांध, दुराग्रही आणि कट्टरपंथी बनतात. यामुळे मुल्ला, मौलवी, पंडे पुजारी भरपूर पैसा कमावतात. त्यांची चांदी होते. ते या लोकांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करतात. परिणामी समाजात अराजकता, धार्मिक द्वेष आणि फुटीर वृत्ती उत्पन्न होते. 


अनेक शिकलेले, श्रीमंत, प्रतिष्ठित पुढारी सर्व अंधविश्वासापासून पूर्णपणे मुक्त नाहीत. हे सर्व जण वेळोवेळी ज्योतिषी. मात्रिक यांना शरण जाताना दिसतात. अंधक्विास आणि दुराचरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू बाहेत. एकाचे निराकरण झाले की दुसऱ्याचे निराकरण आपोआपच होते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद