संगणक वर मराठी निबंध | Essay On Computer In Marathi

 संगणक वर मराठी निबंध | Essay On Computer In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  संगणक मराठी निबंध बघणार आहोत. संस्कृतीच्या विकासाबरोबरच उत्तरोत्तर मानवाची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती होत गेली. विविध इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या शोध्याबरोबरच अनेक आधुनिक उपकरणे निर्माण केली गेली. 


वास्तविक संगणक ही मानवाने लावलेल्या शोधांतून मिळालेली देणगी आहे. संगणकाचा उपयोग संशोधनकार्य, शोध ऋतुसंबंधीची माहिती, बँक, इत्यादी अनेक क्षेत्रांत होतो. संगणकाच्या वापरामुळे कार्यास गती येते. कार्य कौशल्यपूर्ण होते. अंतर्गत व्यवस्था चांगली होते. आकडेवारी व माहितीचा चांगला उपयोग होतो. कार्यप्रणालीवर चांगले


संगणकाची कार्यपद्धती द्विआधार पद्धती (बायनरी सिस्टिम) वर आधारित आहे. जर्मनीतील गणितज्ञ व तत्त्वज्ञ गोटफ्रिड, बिलहेल्म लायबनिज (१६६४-१७९६) ने असे सुचविले की सर्व पाढ्यांचा आधार शून्य व एक मानावा या द्विआधारी पद्धतीत बेरीजवजाबाकीची प्रक्रिया सहजपणे करता येते. 


गुणाकार आणि भागाकार पण बेरजेच्या क्रमात करता येतो. या पद्धतीत अंकाची सुरवातीच्या व शेवटच्या अक्षरांना जोडल्यानंतर जो शब्द त्यास 'द्वयंक' (Bit) म्हणतात. आठ बिटांच्या समूहाला बाईट (Byte) म्हणतात. १०२४ बाईट समूह मिळून एक किलोबाईट बनतो. 


अंदाजे १५० वर्षांपूर्वी सर्वप्रथम संगणक निर्मितीच्या सिद्धांताचे प्रतिपादन इंग्लंडमधील चार्ल्स बेबेज या शास्त्रज्ञाने केले. याच्याच सिद्धांताच्या आधारावर हॉर्वर्ड विद्यापीठ (अमेरिका) १९३७ ते १९४४ या काळात संगणकाचा प्राथमिक विकास प्रा. होबोर्ड आयकन याने केला. 


या संगणकाचे वजन दोन टन होते. त्याची लांबी १५ मीटर व रुंदी 27 मीटर होती. १९६५ मध्ये इंटिग्रेटेड सर्किटपासून पहिला संगणक निर्माण करण्यात आला. त्यानंतर मागील काही वर्षांत संगणकाचा वेगाने विकास झाला. आता संगणक मनुष्यच संचालित करतो. 


त्याच्याच सूचनेप्रमाणे तो काम करतो. संगणकात मानवसदृश सर्व गुणांचा समावेश करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संगणकाचा प्रमुख भाग म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्यात अनेक छोटे भाग असतात. संगणकाच्या एककापासूनच गणना होते. 


सेंट्रल प्रोसेसिंगशिवाय त्याचे अन्य भाग विद्युत कुंजिका, विद्युत यांत्रिक प्रिंटर डिस्क संचय एकक, आवरण, इंटरफेस आणि टेपडेक असतात. भारतात शिक्षणाचा प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. साक्षरतेच्या मोहिमेत संगणक महत्त्वाची भूमिका बजावीत आहे.(वर्गात शिक्षक जे व्याख्यान देतात त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्याला होतोच असे नाही. परंतु संगणक प्रत्येक विद्यार्थ्याला सारखे शिक्षण देण्यात सक्षम आहे.)


संगणकाच्या उपयोगामुळे बँकेच्या कार्यात सुधारणा झाली आहे. बँकेत संगणकावर प्रत्येक ग्राहकाच्या खात्याची संपूर्ण माहिती पाहावयास मिळते. त्याचे प्रिंट आऊट पण काढता येते. बँकेचा दैनंदिन हिशेब काही क्षणांतच संगणक आपणास देतो. 


संगणकात ग्राहकांच्या हस्ताक्षरांचा संग्रह करून एका स्कॅनरच्या साह्याने काही क्षणांत त्यांच्या हस्ताक्षराची तपासणी करता येते. बँकेच्या बाहेर कॉम्प्युटराईज्ड स्वयंचलित यंत्रे बसविलेली असतात. त्याद्वारे ग्राहक केव्हाही पैसे काढू शकतात, जमा करू शकतात, चेकसाठी अर्ज करू शकतात. याला वेळेचे बंधन नाही. 


संगणकाद्वारे वधूवरांची निवड करता येते. अनेक उपवर तरुण-तरुणींचे स्वभाव, वय, जात, आवडी इत्यादी माहिती संगणकात साठविली जाते. याच आधारावर निवड केली जाते.


रशिया, अमेरिका, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये संगणकाचा उपयोग संरक्षण कार्यात होतो. याद्वारे गुन्हयांचा तपास केला जातो. विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जातात. विविध विषयांचा अभ्यासक्रम तयार करण्यात मदत होते. विमाने आणि रेल्वेत आरक्षण करता येते. 


संगणकाच्या मदतीने अनेक टेलिफोन लाईन्स एकमेकांना जोडल्या जातात. एखाद्या व्यक्तीच्या गैरहजेरीत फोनवर आलेला संदेश संगणक टाईप करून ठेवतो आणि फोन करणाऱ्याला ती व्यक्ती कधी उपलब्ध असू शकेल ते सांगतो ई-मेलची सोय पण संगणकावर उपलब्ध असते.


संगणकाचा उपयोग डिझाईन, ड्रॉईंगसाठी पण केला जातो. यामुळे चित्रपट उद्योगात क्रांती घडून आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही संगणकाचा उपयोग होतो. वाहतूक नियंत्रणासाठी संगणकाचा वापर केला जातो. वाहनांच्या येण्या जाण्यावर संगणकाच्या आदेशामुळे आपोआप नियंत्रण येते.


वाहनांची, प्रवाशांची संख्या संगणक सांगतो. मोटार वा अन्य वाहनात रेडियो संचार व्यवस्थेखेरीज एक मायक्रो संगणक असतो. आवश्यकतेनुसार तो अॅम्ब्युलन्स, अग्निशमनाची त्वरित मागणी करतो. रोबोट हा सुद्धा एक प्रकारचा संगणकच आहे. तो माणसाप्रमाणे कार्य करतो.


संगणकाचा दुरुपयोग पण केला जातो उदा. जुगार खेळणे, अश्लील चित्र पाहणे, संगणकाच्या साह्याने कुणाचेही नग्न चित्र काढता येते. कधीकधी संगणक चुकाही करतो. काही जणांना अशी भीती वाटते की संगणक मानवी बुद्धीच्याही पुढे जाईल. परंतु संगणक हे एक निर्जीव यंत्र असल्यामुळे ही गोष्ट शक्य नाही.) 


ही गोष्ट खरी की संगणक अत्यावश्यक यंत्र आहे ज्याचा विकास आपल्या सुखासाठी निरंतर केला जाऊ शकतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद