निरस्त्रीकरण मराठी निबंध। Essay on Disarmament in Marathi

निरस्त्रीकरण मराठी निबंध। Essay on Disarmament in Marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निरस्त्रीकरण मराठी निबंध बघणार आहोत. अनुक्रमे ६ ऑगस्ट व ७ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी या जपानमधील दोन शहरांवर अणुबाँब टाकले. त्याच्या दोन दिवसांनंतर पाहता पाहता ३ लाख ४० हजार लोकसंख्या असलेली ही शहरे स्मशानात परिवर्तीत झाली. 


घरे जळू लागली. त्याच्या खिडक्या, दरवाजे, छपरे उडून गेली. पशु पक्षी माणसे सारे मृत्यू पावले. धूळ आणि धुराचे असे लोट उठले की जणू काळे ढगच. संपूर्ण आकाशच या ढगांनी व्यापून टाकले. स्फोटाचा झटका इतका जबरदस्त होता की १७ कि. मी. दूरवर असलेल्या घरांनाही जो जाणवला. शहरातील ७० टक्के घरांची पडझड झाली. 


इतिहासात या सारखी दुसरी दु:खद घटना घडलेली दिसत नाही. या बाँबस्फोटातून जे विषारी वायू व किरणे सीमेशी खेळ करतात. बहुसंख्येने शस्त्रांची आयात करतात उदा. पाकिस्तान वारंवार काश्मीरच्या मुद्यावर भारताशी भांडण उकरून काढते. पाकिस्तानचा प्रत्येक सत्ताधीश असे करण्यात यशस्वी झाला आहे. 


पाकिस्तान, अमेरिका, चीन इ. देशांकडून शस्त्रे मिळवितो त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाला आपल्या सैनिकी बळात वाढ करणे भाग पडते. भारताला आपल्या आर्थिक अंदाजपत्रकाचा मोठा भाग सेनेवर, शस्त्रांवर खर्च करावा लागतो.


शस्त्र स्पर्धेमुळे शक्ती संतुलन डगमगले आहे. विकास थांबल्यागत झाला आणि जनता भयभीत झाली आहे. विकसित देश आपल्या प्रचंड शस्त्रसाठ्यांच्या आधारे विकसनशील देशांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करून त्यांचे आर्थिक, संतुलन बिघडवितात. एकीकडे विकसित राष्ट्रांनी शस्त्र स्पर्धेत भाग घेणे, शस्त्रनिर्मिती करणे हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तर विकसनशील देशांसाठी तो त्यांच्या अस्तित्वाचाच मुद्दा बनत आहे. 


आज संपूर्ण जग शस्त्रांच्या पाठीमागे धावत आहे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ व मानव कल्याण मंचाकडून नि:शस्त्रकरणाची मागणी केली जात आहे. आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शस्त्रनिर्मिती केली जाते. मानवतेपुढे हे एक संकटच उभे राहिले आहे. जास्त फायदा मिळावा म्हणून राष्ट्रे शस्त्रनिर्मितीत वाढ करीत आहेत. 


या व्यापारात मोठ्या प्रमाणावर देण्याघेण्याचे व्यवहार चालतात. उदाहरण बोफोर्स कांड, शस्त्रांचे दलाल दहशतवाद्यांच्याही मागण्या पूर्ण करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. आपल्या मालाची विक्री करण्यासाठी व्यापारी आणि दलाल नीच मार्गाचा अवलंब करतात. 


राष्ट्राराष्ट्रात सामान्य कारणांवरून भांडणे लावतात. जगात अशी अनेक उदाहरणे सापडतात की एखाद्या विशेष शस्त्राची पारख करण्यासाठी युद्धे झाली होती. आज अशा प्रकारच्या मनोवृत्तीशी झगडण्याची वेळ आली आहे. आता सर्व राष्ट्रांनी नि:शस्त्रीकरणाचा मार्ग स्वीकारला पाहिले.


राष्ट्रांनी आपला स्वार्थ सोडून निःशस्त्रीकरणाचा मार्ग स्वीकारून मानवजातीचे भविष्य सुरक्षित केले पाहिजे. आता चर्चेची गरज नसून प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. जर निःशस्त्रीकरण करण्यात यश मिळाले तर विश्वशांतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद