जगदीश चंद्र बोस मराठी निबंध। Jagdish Chandra Bose Essay In Marathi

 जगदीश चंद्र बोस मराठी निबंध। Jagdish Chandra Bose Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जगदीश चंद्र बोस मराठी निबंध बघणार आहोत. डॉक्टर सर जगदीशचंद्र बोस एक थोर भारतीय शास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या शोधांनी आणि मौलिक संशोधनाने साऱ्या जगाला चकित करून सोडले होते. 


ते पाहिले असे शास्त्रज्ञ होते ज्यांनी वनस्पती संवेदनशील असतात हे सिद्ध करून दाखविले. त्यांना पण सुख, दु:ख, थंडी, उष्णता प्रकाश, अन्न इत्यादींच्या अन्य प्राण्यांप्रमाणे जाणीवा असतात. त्यांनी अनेक वैज्ञानिक यंत्रांचा शोध लावला. त्यात क्रेस्टोग्राफ हे यंत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. 


वनस्पतींची संवेदनशीलता मोजण्यासाठी ते फार उपयुक्त आहे. कारण वनस्पतीच्या सूक्ष्मातिसूक्ष्म क्रिया हे यंत्र दहा हजार पट मोठ्या करून दाखवू शकते. या यंत्राच्या मदतीनेच डॉ. बोस यांनी वनस्पती आणि प्राणी यांच्यात असणारा अनेक बाबतीतील सारखेपणा सिद्ध करून दाखविला परंतु यामुळे बोस यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी चुंबकीय क्रेस्टोग्राफ बनविला. 


जो वनस्पतीची सूक्ष्म गती १० लाख पट मोठी करून दाखवितो. लंडन येथे रॉयल सोसायटीत या यंत्राची पूर्ण तपासणी केली गेली आणि खरोखरच ते आश्चर्यकारक ठरले. या यंत्राच्या साह्याने निर्विवादपणे हे सिद्ध झाले की ज्याप्रमाणे सर्व जीवांमध्ये संचालन, आकंचन, प्रसरण, स्पंदन आणि रक्ताभिसरण असते. 


त्याचप्रमाणे वृक्षवेली वनस्पतींमध्ये पण या सर्व क्रिया असतात. वनस्पतीला जीव असतो हे जसे डॉ. बोस यांनी सिद्ध केले तसेच जड पदार्थांवरही बाह्य उत्तेजनेचा प्रभाव पडतो आणि ते त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात हे सिद्ध केले. 

जास्त उत्तेजक पदार्थांमुळे त्यांची शक्ती वाढते व त्यामुळे ते थकतातही. यांनी हे पण दाखविले की जड पदार्थ विश्रांतीनंतर आपल्या पूर्वस्थितीत येतात आणि विषारी पदार्थांमुळे त्यांची शक्ती नष्ट होते.


जड आणि चेतन, जीव व वनस्पतींच्या या सूक्ष्म रहस्यांचा भेद करणारे ते पहिले शास्त्रज्ञ होत. ते एक प्रसिद्ध वनस्पती व भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांच्या थोर कार्याने, लेखांनी, पुस्तकांनी आणि संशोधनाने सर्वांना आश्चर्यचकित केले. 


त्यांनी वायरलेस टेलिग्राफीचाही शोध लावला होता पण त्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही कारण मार्कोनीने आधीच याचे पेटंट घेतले होते. लंडन, पॅरिस, युरोप इत्यादी ठिकाणांचा प्रवास डॉ. बोस यांनी केला. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी भाषणे दिली. आपले संशोधन सादर केले आणि खूप प्रसिद्धी मिळविली. 


प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथे अध्यापनाचे काम केले. इ. स. १९१५ मधे त्यांनी "बोस विज्ञान मंदिर" स्थापन केले व आपले कार्य चालू ठेवले. इ. स. १९३७ मध्ये वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते खऱ्या अर्थाने एक थोर शास्त्रज्ञ व थोर व्यक्ती होते. 


निर्जीव पदार्थ, वनस्पती आणि प्राण्यांमधील साम्य दाखवून जे महान कार्य केले त्यामुळे ते चिरस्मरणीय ठरले. त्यामुळे आपणास जीवनाच्या एकरूपतेचे नवे दर्शन घडले आणि सत्याचा साक्षात्कार झाला. एक अद्भुत चमत्कार घडला.


डॉ. बोस यांचा जन्म इ. स. १६५८ मध्ये पूर्व-बंगालमधील ढाका जिल्हयातील राढस्वाल गावी झाला. सेंट झेवियर कॉलेज कलकत्ता येथून त्यांनी बी.ए. केले. नंतर उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तिथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात अध्ययन केले. 


इ. स. १८८५ मध्ये ते भारतात परत आले. प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. ते अत्यंत नम्र व स्वाभिमानी होते. अशा थोर शास्त्रज्ञाचा आम्हाला अभिमान वाटतो. 


वनस्पतीलाही जीव असतो हे सिद्ध करून मानव इतर प्राणी व वनस्पती यांच्यातील साम्य दाखविले. या सत्याने आपला दृष्टिकोन विशाल झाला, जीवनाच्या एकरूपतेचे रहस्य समजले आणि आपण अधिक संवेदनशील व दयाळू बनलो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद