जाहिरात-एक कला निबंध | Jahirat Ek Kala Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जाहिरात-एक कला मराठी निबंध बघणार आहोत.आजचे युग जाहिरातींचे युग आहे. वाढत्या औद्योगिकीकरणाचे ते एक आवश्यक अंग बनले आहे. एखाद्या वस्तूचा प्रसार-प्रचार करण्याचे ते एक माध्यम आहे.
जाहिरातीमुळे एखाद्या वस्तूच्या वैशिष्ट्यांची, त्याच्या उपयोगाची व ती विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असल्याची माहिती मिळते आणि लोक ती वस्तू विकत घेण्यासाठी उतावीळ होतात. प्रचाराची आणि जाहिरातींची साधने जितकी चांगली व सशक्त असतील तितकी जाहिरात केलेल्या वस्तूची विक्री उत्साहजनक होईल.
जाहिरात करणे की एक कला आहे. जाहिरातीत सामान्याला विशिष्ट आणि विशिष्टाला सामान्य करण्याची अद्भुत क्षमता असते. जाहिरात कलेला प्रभावशाली बनविण्यास दुसऱ्या अनेक कला साह्यभूत ठरत असतात. चित्रकला, लेखनकला, संगणक, ॲनिमेशन, फोटोग्राफी, प्रकाशनकला यांची मदत घेत जाहिरात कला आपल्या उद्दिष्टात सफल होते.
आज जाहिरात कला इतकी महत्त्वाची झाली आहे की लोक अशा वस्तू व सेवांची जाहिरात करतात की, जी करणे प्रतिष्ठेचे समजले जात नाही. उदा. विवाहविषयक, मृत्यूविषयक, खरेदी-विक्री इ. आज आपल्याजवळ जाहिरातीचा स्वतंत्र अभ्यासक्रम, दृक, श्राव्य साधने उपलब्ध आहेत. छापील साधनांत मासिके, वृत्तपत्रे, बॅनर, होर्डिंग, पाम्प्लेट, हँड बिल, पोस्टर्स इ. भिंतीवरही जाहिराती लिहिल्या जातात.
मासिकांत छापल्या जाणाऱ्या जाहिराती मोठ्या व रंगीत असतात. रेडिओवर, ओरडून लाऊडस्पीकरवरही जाहिराती केल्या जातात हे जाहिरातीचे श्राव्य साधन होय. निवडणुकीच्या काळात जाहिरातींचे हे साधन फार लोकप्रिय ठरते.
जाहिरातीच्या श्राव्य साधनाद्वारे केवळ आवाजच ऐकता येतो. परंतु दृश्य साधनांद्वारे केलेल्या जाहिरातीचे महत्त्व खूपच वाढते. दूरदर्शनवर जाहिरातींचे प्रमाण फार वाढले आहे. यात जाहिरात केलेल्या वस्तूचा रंग, रूप, आकार प्रकार याबरोबरच त्या वस्तूचा वापरणाऱ्यावर काय परिणाम होतो तेही दाखविण्यात येते.
साबण, डिटर्जंट पावडर, टूथपेस्ट, क्रीम इ. उपभोग्य वस्तूंची विक्री वाढविण्याचा प्रयत्न जाहिरातींच्या माध्यमातून केला जातो. त्याचे उत्पादक आपले उत्पादन परिणामकारक असल्याचा दावा करतात. त्याचा लोकांवर खूप परिणाम होतो.
आधुनिक काळात जाहिरात करण्याच्या अनेक नव्या पद्धती प्रचलित झाल्या आहेत. उदा. आनंद मेळा, प्रदर्शनने, फॅशन शो. इत्यादी व्यावसायिक मेळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होतात. प्रदर्शनासाठी हॉल किंवा पंचतारांकित हॉटेल आरक्षित केले जाते.
नव्या डिझाईनच्या तयार कपड्यांसाठी फॅशन शो आयोजित केले जातात. त्याबरोबरच उत्पादक आपल्या उत्पादनांची जाहिरात करतात. कोणत्याही उत्पादनाची जाहिरात तीन भागांत केली जाते. पाहिल्या भागात लोकांना उत्पादनाच्या वितरणाशी परिचित केले जाते.
दुसऱ्या भागात त्यांच्या बँडला लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण लोक वस्तूचा 'बँड' पाहूनच वस्तू खरेदी करतात. तिसऱ्या भागात त्या वस्तूचा बाजारात किती प्रभाव व वर्चस्व आहे ते दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.
आज जाहिरात व्यवसाय खूपच वाढला आहे या व्यवसायात बऱ्याच लोकांना रोजगार ही मिळाला आहे. अनेक लेखक, चित्रकार, फोटोग्राफर, पेंटर, संगणक तज्ज्ञ, तांत्रिक व अतांत्रिक लोक या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. जाहिरात क्षेत्रात अनेक कलाकारांना आपली कला दाखविण्याची संधी मिळते.
जाहिरात कलेचा उद्देश एखाद्या नव्या उत्पादनाची सूचना लोकांना देणे आणि त्याचा प्रसार प्रसार करणे हा असतो. परंतु त्यात आकर्षकपणा व विचित्रपणा आणण्याच्या नावावर घाणेरड्या जाहिराती केल्या जातात. अनेकदा जाहिरातीत स्त्रीच्या अर्धनग्न वा नग्नरूपाचा उपयोग केला जातो.
त्यामुळे जाहिरात आकर्षक बनते. जाहिरातीत घाणेरडी भाषा व द्वैर्थी संवादांचाही उपयोग केला जातो. अशा प्रकारच्या जाहिरातींवर निर्बंध आणणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकजागृती केली पाहिजे. सरकारचेही याकडे लक्ष वेधून घेतले पाहिजे.
याखेरीज भिंतीवर जाहिराती लिहिणे, पोस्टर चिटकविणे यामुळे गावाचे/शहराचे सौंदर्य नष्ट होते म्हणून त्यावर प्रतिबंध लावण्यात आले पाहिजेत. जाहिरातींवर केला जाणारा खर्च ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जातो. म्हणून एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच तो खर्च उत्पादकांनी केला पाहिजे.
आज जाहिरात कलेचे पूर्ण व्यावसायिकीकरण झाले आहे. अशा स्थितीत या कलेचा उच्च स्तर कायम ठेवण्यासाठी सरकारनेही खंबीर पावले उचलली पाहिजेत. जाहिरात तयार करणाऱ्या कलाकारांनीसुद्धा मर्यादेत राहूनच काम करावे.
सुरुचिपूर्ण कलेचा जर योग्य उपयोग केला तर ज्या उद्देशाने जाहिरात केली तो उद्देश सफल होईल. जाहिरात ही एक यशस्वी कला होईल. असे झाल्यास जाहिरातदार, उत्पादक, आपल्या, ग्राहकांचा आदर प्राप्त करू शकतील आणि अधिक काळ बाजारात टिकू शकतील. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद