रंग मराठी निबंध Rang Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण रंग मराठी निबंध बघणार आहोत. रंगांचा स्वत:चा एक अद्भुत आणि मनोहर असा संसार आहे. बिनरंगांच्या जीवनाची कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. रंग हे विविधता, सौंदर्य, स्वाद, ताजेपणा, आवड आणि आकर्षणाचा पर्याय बनले आहेत.
रंग उडणे, रंग माजवणे, रंग जमणे, रंग मारणे, एखाद्याच्या रंगात रंगणे, रंगी बेरंगी रंगमहाल, रंगात भंग, रंगभवन, रंगमंदिर इत्यादी अनेक वाक्प्रचार आणि अभिव्यक्ती ही गोष्ट दर्शवितात. रंगांची विविधता बेजोड आहे. एकाच रंगाची अनेक चित्रे आणि छायाचित्रे असतात.
दोन किंवा दोनापेक्षा जास्त रंग मिळून एक वेगळाच रंग निर्माण होतो. जर जग फक्त काळ्या पांढऱ्या किंवा स्लेट रंगाचे असते तर काय झाले असते. सगळी मजाच गेली असती. जीवनात काही रंगतच राहिली नसती. सगळीकडे उबगलेले, थकव्याचे, उदासीनतेचे साम्राज्य निर्माण झाले असते.
जे वर्णांध असतात त्यांना आपण किती दुर्दैवी आहोत हे माहिती असते. कारण त्यांचे डोळे विविध रंग पाहू शकत नाहीत. रंगांचा आनंद घेऊ शकत नाहीत. आपल्या डोळ्यांत दोन प्रकारच्या पेशी असतात. कॉन्स आणि रॉडस कॉन्स पेशी आपणास निरनिराळे रंग पाहण्यास साय करतात.
वेगवेगळ्या पेशी वेगवेगळ्या रंगांच्या प्रति संवेदनशील असतात. वर्णाध लोकात या पेशींचा अभाव असतो. ते केवळ ग्रे किंवा किंचित भुरा रंगच पाहू शकतात. त्यांच्यात केवळ रॉड पेशीच असतात. दुसऱ्या कॉन पेशी खराब असतात. अनेक जनावरे जसे कुत्रे, मांजर, बैल, ससे इत्यादी वर्णांध असतात. याउलट मधमाशा साप, पाली, पक्षी अनेक प्रकारचे मासे रंग पाहू व ओळखू शकतात.
लाल, निळा आणि हिरवा या रंगांना प्राथमिक रंग म्हणतात. त्यांना विविध प्रमाणात एकमेकांत मिसळून दुसरे रंग तयार करता येतात. जर हे सारख्या प्रमाणात मिसळले तर पांढरा रंग तयार होतो. तात्पर्य, पांढरा रंग या तीन रंगांचे मिश्रण आहे. रंगाचा प्रकाशाशी दाट व प्रत्यक्ष संबंध आहे.
प्रकाशाशिवाय रंग असू शकत नाहीत म्हणूनच रात्रीच्या अंधारात सगळे रंग लुप्त होतात. प्रकाशाच्या श्वेत किरणात इंद्रधनुष्याचे सात रंग असतात. ते म्हणजे लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा, बैंगनी प्रकाश किरणे, जेव्हा प्रिझममधून जातात तेव्हा हे सात रंग स्पष्ट दिसतात. यास स्पेक्ट्रम म्हणतात.
सर्वप्रथम आयमॅक न्यूटन याने एका प्रिझममधून प्रकाश किरणे पाठवून हा प्रयोग केला होता. त्यांनीच या प्रकाश स्पेक्ट्रमचा शोध लावला. प्रिझम प्रकाशाच्या श्वेत किरणांना सात रंगांत विखरून टाकतो. पाण्याचे लहान लहान थेंब पण हे कार्य सहजपणे करू शकतात. परिणामी आपण इंद्रधनुष्य पाहू शकतो. जर हे सात रंग एकात मिसळले तर पुन्हा ते पांढऱ्या रंगात परिवर्तीत होतील.
प्राथमिक रंगांचे मिश्रण केल्यावर जे रंग तयार प्राप्त होतात त्यास पूरक रंग म्हणतात. उदा. लाल व हिरव्या रंगाचा प्रकाश मिसळून पिवळा रंग होतो. वस्तू रंगीत दिसतात कारण त्या एका विशेष रंगाला परावर्तीत करून अन्य रंगांना आपल्यात सामावून घेतात.
लाल रंगाच्या वस्तू प्रकाशातील लाल रंगाला परावर्तीत करतात आणि अन्य रंगांचे शोषण करतात. अशा प्रकारे हिरव्या रंगाच्या वस्तू हिरव्या रंगाला परावर्तीत करतात आणि अन्य रंग शोषून घेतात. परावर्तीत रंगच प्रकाशाचा तो रंग आहे ज्या रंगाच्या वस्तू आपणास दिसतात.
एखादी काळी वस्तू यासाठी काळी दिसते की ती प्रकाशातील सर्वच रंगांचे शोषण करून घेते. याउलट पांढरी वस्तू आपणास यासाठी पांढरी दिसते की ती कोणत्याही रंगाचे शोषण करीत नाही. तिच्याकडे येणाऱ्या प्रकाशाच्या सर्व रंगांना परावर्तीत करते.
पेंटचे प्राथमिक रंग प्रकाशाच्या प्राथमिक रंगापेक्षा भिन्न लाल, निळ्या, पिवळ्या रंगाचे असतात. जेव्हा या रंगांना योग्य प्रमाणात मिसळले जाते तेव्हा तो काळ्या कत्थई रंगाचा पेंट बनतो. निळ्या प्रकाशात हिरव्या वस्तू काळ्या दिसतात. त्याचप्रमाणे लाल प्रकाशात हिरव्या वस्तू काळ्या दिसतात.
प्राथमिक लाल व हिरवा प्रकाश मिळून पिवळा रंग निर्माण होतो. रंग उष्ण आणि शीत असतात. लाल रंग उष्ण तर निळा, हिरवा रंग शीत असतो. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद