साक्षरता अभियान मराठी निबंध | Saksharta Abhiyan Essay in marathi

 साक्षरता अभियान मराठी निबंध | Saksharta Abhiyan Essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण साक्षरता अभियान मराठी निबंध बघणार आहोत. भारताची गणना आज विकसनशील राष्ट्रांत होते. परंतु निरक्षरता त्याला अधिक शक्तिशाली बनविण्यात बाधक आहे. आजही भारतातील बहुतांश जनता अशिक्षित आहे. शिक्षणाच्या अभावामुळे मानव पशुसमान बनतो. शिक्षण सत्याची ओळख करून देते. 


मनुष्याची निद्रिस्त प्रतिमा जागृत करते. अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढून त्याला उजेडात आणतो. "तमसो मा ज्योतिर्गमय" मनुष्य आयुष्यभर काही ना काही शिकत राहतो. त्याचे अनुभव हे एक प्रकारचे शिक्षणच आहे. विचारवंतांचे असे मत आहे की शिक्षण जिथे मिळेल. जेव्हा मिळेल तेव्हा हात पुढे करून घेतले पाहिजे.


आज जग चंद्रावर वस्ती करण्याचा विचार करीत आहे. तर भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनही तो स्वत:ला अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढू शकला नाही. ज्या भारतवर्षाला प्राचीन काळात शिक्षण क्षेत्रात जगद्गुरू मानले जाई त्या देशातील जनता आज अशिक्षित असणे हा फार मोठा कलंक आहे. 


हा कलंक धुऊन काढण्यासाठी भारत सरकारने प्रौढ़ शिक्षणाची एक व्यापक योजना २ ऑक्टोबर १९७८ ला लागू केली. २५ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना शिक्षित करणे हा प्रौढ शिक्षणाचा अर्थ आहे. निरक्षरांना शब्द ज्ञान, अर्धसाक्षरांना पूर्ण शिक्षण देणे म्हणजे प्रौढ शिक्षण.


अशिक्षित व्यक्तींमध्ये धर्मांधता चटकन घर करते व ते अंधविश्वासू दुसऱ्यांचे लगेच ऐकतात. आपले हित-अहित ओळखण्याची, विचार करण्याची, समजून घेण्याची त्यांची मानसिक क्षमता क्षीण होते. सामाजिकदृष्ट्या मागासलेले राहिल्यामुळे समाजात ते उपहासाचा विषय बनतात. धोकेबाज लोकांकडून फसविले जातात. 


सरकार बनविण्यात त्यांच्या मताचा मोठा सहभाग आहे हेही त्यांना माहिती नसते. शिक्षणाच्या अभावामुळे मनुष्य कुपमंडूक बनतो. भारतात इंग्रजी राजवट येण्यापूर्वी जनता सामान्यत: शिक्षित होती. त्यावेळी शिक्षण शाळा, मंदिरे, मदरसे, मठ, गुरुकुलांत आणि आश्रम यातून दिले जाई. प्रत्येक गावात शिक्षणाची व्यवस्था होती. जगातील सर्वाधिक साक्षर लोक भारतात राहत होते. इतिहासात याचे पुरावे आहेत.


इंग्रजांच्या राजवटीत प्राथमिक शिक्षण नष्ट झाले. मध्यम व कनिष्ठ वर्गीयांना शिक्षणापासून वंचित करण्यात आले. इंग्रज शासनकर्त्यांची अशी इच्छा होती की भारतीयांनी अशिक्षित राहावे, त्यांच्यात स्वातंत्र्य आणि अधिकाराची भावना जागृत होऊ नये अन्यथा ते स्वातंत्र्याची मागणी करतील. यात इंग्रज यशस्वीही झाले आणि त्यांनी २०० वर्षे भारतावर राज्य केले.


अशिक्षित जनतेला विशेषतः स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी राजा राममोहन रॉय, पंडित मदनमोहन मालवीय, महर्षि दयानंद सरस्वती, म. गांधी इत्यादींनी विशेष प्रयत्न केले. शास्त्र असे सांगते की, जर तुम्ही एखाद्या वृक्षाचे फळ खाऊ इच्छित असाल तर त्याची मशागत मुळापासून करा. यावर विचार करून सरकारने प्राथमिक शिक्षणावर जास्त जोर दिला. 


भविष्यात येणारी पिढी त्यामुळे सुशिक्षित होईल. सरकारच्या या धोरणामुळे देशात शिक्षितांची संख्या वाढली. आपल्या देशातील अधिकांश जनता निरक्षर आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन सरकारने प्रौढ शिक्षण लागू केले. 


शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचे ज्यांचे वय नसते म्हणजेच वय जास्त असल्यामुळे प्राथमिक शाळेत जाऊन शिकण्याचा ज्यांना संकोच वाटतो, दिवसा पैसे कमवावे लागत असल्यामुळे शाळेत जाऊ शकत नाहीत अशा लोकांच्या घराजवळच दिवसा आणि रात्री शिकण्याची सोय केली. 


प्रौढ़ शिक्षणाचा विधिवत श्रीगणेशा करण्याचा मुख्य उद्देश प्रौढांना लिहिता वाचता येणे आणि साक्षरतेचा प्रचार-प्रसार करणे हा होता. प्रौढ़ शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट होते प्रत्येक मजूर, शेतकरी आणि कोणत्याही वर्गाच्या व्यक्तीला ती कोणतेही कार्य करीत असो लिहिण्या वाचण्याचे सामान्य ज्ञान तिला असावे. व त्याचा उपयोग तिने आपल्या व्यावहारिक जीवनात करावा, 


ज्याला शिक्षण नाही त्याने शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे आणि आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. सुशिक्षित आई-वडीलच आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. सरकारने प्रौढ शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी शहरात, गल्लीत, गावात ठिकठिकाणी प्रौढ शिक्षण केंद्रे स्थापन केली. 


त्यामुळे शिक्षणासाठी कुणाला दूर जाण्याची गरज राहू नये आणि जास्तीत जास्त प्रौढांनी प्रौढ शिक्षण केंद्रांत जाऊन प्रौढ शिक्षणाचा लाभ ध्यावा. याठिकाणी त्यांना ज्यावेळी रिकामा वेळ असेल त्यावेळी शिक्षण घेण्यासाठी जाता येते. सर्व दैनंदिन कामे पूर्ण झाल्यावर अल्प वेळ विद्याभ्यासासाठी ते लावू शकतात. ही वेळ रात्री ८ ते १० अशी आहे. 


स्त्रियांसाठी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अध्ययनाची व्यवस्था केली जाते. या केंद्रामध्ये शिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी मोफत पुरविल्या जातात. शेती करण्याच्या नव्या प्रगत पद्धती शिकण्यासाठी अशिक्षित पुरुषांना शिक्षण देणे आवश्यक आहे. देश-विदेशांतील विकास कार्याची माहिती मिळविणे, दैनंदिन हिशेब ठेवणे याही गोष्टी शिक्षणामुळे येतात. 


आधुनिक युगात पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही शिक्षित करणे आवश्यक आहे. शिकलेली आई आपल्या मुलांचे पालन-पोषण योग्यप्रकारे करू शकते. त्यांच्या भविष्याबद्दल जागरुक राहते. शिक्षणाचा पहिला धडा मूल आपल्या मातापित्याकडूनच शिकते म्हणून त्यांनी शिक्षित असणे अनिवार्य आहे.


आज लोक संकोचामुळे प्रौढ शिक्षण केंद्रात येत नाहीत. त्यांची समजूत घालून, आमिष दाखवून या केंद्रामधे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. एक जण पुढे झाला की मग बाकीचे आपोआपच त्याच्या मागे येतील. स्वयंसेवी संस्थाही या कार्यात सहकार्य करतात.


प्रौढ़ शिक्षणाच्या विकासावर सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. वाढती लोकसंख्या आणि वाढती गरिबी यांच्यासमोर सरकार विवश होते. लाखो लोकांचे विदेशांतून भारतात स्थलांतर होते आणि ते पुन्हा आपल्या देशात परत जात नाहीत. 


यामुळेही प्रौढ शिक्षणाचे कार्य मंदगतीने चालते. श्रीलंका, बांगलादेश चे निर्वासितांचे लोंढे अजूनही भारतात येतच आहेत. प्रौढ शिक्षणाबाबत लोकांचा उत्साह कमी झाली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मजूरवर्ग खूप मेहनत करतो. घरी परतल्यावर विश्रांती घेऊ इच्छितो. मानसिकदृष्ट्या बेचैन असल्यामुळे शिक्षणाबाबत उदासीन असतो म्हणून मग शिक्षणाचे योग्य वातावरणही बनू शकत नाही.


निष्ठावान कार्यकर्त्यांचा अभाव असल्यामुळे प्रौढ शिक्षणात अडचणी येतात. शिक्षकांना विशेषतः शिक्षिकांना मिळणारे अत्यल्प वेतन, शिक्षकांची टिकून काम न करण्याची वृत्ती यामुळेही प्रौढ शिक्षणात अनेक अडचणी येतात. चांगली नोकरी मिळाली की शिक्षक तिकडे जातात. 


साक्षरता अभियानात स्वार्थी, राजकारणी आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी हस्तक्षेप करणाऱ्यामुळे या अभियानाची प्रगती दोन पावले मागेच असते. साक्षरता अभियानाला रोजगाराभिमुख बनविण्यात आले नसल्यामुळे लोक याकडे आकर्षित होत नाहीत.


प्रौढ शिक्षणाला सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी लागेल. हे शिक्षण मनोरंजक बनविण्यासाठी नवनवीन युक्त्या, कल्पना अमलात आणून शिक्षकांना चांगले वेतन द्यावे लागेल. राजकीय पक्षांची सक्रिय मदत घेऊन यात प्रगती करावी लागेल. यात स्वार्थी घुसखोरांना घुसून दिले पाहिजे. शिक्षकांना याचे विशेष प्रशिक्षण दिले पाहिजे. 


प्रौढ़ शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी रेडिओ, दूरदर्शन, स्वयंसेवी संस्था, वृत्तपत्रे मासिके यांची मदत घ्यावी लागेल. शिक्षणासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करावी लागेल म्हणजे या कार्यात अडचणी येणार नाहीत. या पैशांचा योग्य उपयोग केला गेला पाहिजे. पैसे खाणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करावी लागेल.


जीवनात शिक्षण सर्वात महत्वाचे आहे. शिक्षणाअभावी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे शोषण करते. जी व्यक्ती आज शिक्षणाचे महत्त्व समजू शकत नाही तिला ते उद्या नक्कीच समजेल. भारतात केरळ हे एकमेव पूर्ण साक्षर असे राज्य आहे. 


हे अभियान आणखी तीव्र करण्यासाठी तरुणांनाही पुढे यावे लागेल. जर एका शिक्षित तरुणाने एका अशिक्षिताला साक्षर केले तर देशभर लवकरच साक्षरतेची पताका पुन्हा फडकेल. साक्षरता अभियान एक शैक्षणिक चळवळ आहे जिची घोषणा आहे. "प्रत्येकाने एकाला शिकवावे" काया वाचा मनाने जर प्रत्येकाने ही तपश्चर्या केली तर ही चळवळ यशस्वी होईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


साक्षरता अभियान मराठी निबंध | Saksharta Abhiyan Essay in marathi


भारताची गणना आज विकसनशील राष्ट्रांत होते. परंतु निरक्षरता त्याला अधिक शक्तिशाली बनविण्यात बाधक आहे. आजही भारतातील बहुतांश जनता अशिक्षित आहे. शिक्षणाच्या अभावामुळे मानव पशुसमान बनतो. शिक्षण सत्याची ओळख करून देते. 


मनुष्याची निद्रिस्त प्रतिमा जागृत करते. अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढून त्याला उजेडात आणते. आज जग चंद्रावर वस्ती करण्याचा विचार करीत आहे. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनही तो स्वत:ला अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढू शकला नाही.



अशिक्षित व्यक्तींमध्ये धर्मांधता चटकन घर करते व ते दुसऱ्यांचे लगेच ऐकतात. आपले हित-अहित ओळखण्याची, विचार करण्याची, समजून घेण्याची त्यांची मानसिक क्षमता क्षीण होते. सामाजिकदृष्ट्या मागासलेले राहिल्यामुळे समाजात ते उपहासाचा विषय बनतात. धोकेबाज लोकांकडून फसविले जातात.


अशिक्षित जनतेला, विशेषतः स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी राजा राममोहन रॉय पंडित मदनमोहन मालवीय, महर्षि दयानंद सरस्वतो, म. गांधी, महात्मा फुले, कर्वे इत्यादींनी विशेष प्रयत्न केले. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने प्राथमिक शिक्षणावर जास्त जोर दिला. 



भविष्यात येणारी पिढी त्यामुळे सुशिक्षित होईल. सरकारच्या या धोरणामुळे देशात शिक्षितांची संख्या वाढली. आपल्या देशातील अधिकांश जनता निरक्षर आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन सरकारने प्रौढ शिक्षण लागू केले. शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचे ज्यांचे वय नसते म्हणजेच वय जास्त असल्यामुळे प्राथमिक शाळेत जाऊन शिकण्याचा ज्यांना संकोच वाटतो, 



दिवसा पैसे कमवावे लागत असल्यामुळे शाळेत जाऊ शकत नाहीत अशा लोकांच्या घराजवळच दिवसा आणि रात्री शिकण्याची सोय केली. शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे, व्यक्तीला ती कोणतेही कार्य करीत असो लिहिण्या वाचण्याचे सामान्य ज्ञान तिला असावे 


व त्याचा उपयोग तिने आपल्या व्यावहारिक जीवनात करावा ज्याला शिक्षण नाही त्याने शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे आणि आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. सुशिक्षित आई-वडीलच आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. 


शिकलेली आई आपल्या मुलांचे पालन-पोषण योग्यप्रकारे करू शकते. त्यांच्या भविष्याबद्दल जागरुक राहते. शिक्षणाचा पहिला धडा मूल आपल्या मातापित्याकडूनच शिकते म्हणून त्यांनी शिक्षित असणे अनिवार्य आहे.
शिक्षणाला सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी लागेल. 


हे शिक्षण मनोरंजक बनविण्यासाठी नवनवीन युक्त्या, कल्पना अमलात आणून शिक्षकांना चांगले वेतन द्यावे लागेल. राजकीय पक्षांची सक्रिय मदत घेऊन यात प्रगती करावी लागेल. शिक्षकांना याचे विशेष प्रशिक्षण दिले पाहिजे. 


शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी रेडिओ, दूरदर्शन, स्वयंसेवी संस्था, वृत्तपत्रे, मासिके यांची मदत घ्यावी लागेल. शिक्षणासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करावी लागेल म्हणजे या कार्यात अडचणी येणार नाहीत. जीवनात शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे. शिक्षणाअभावी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे शोषण करते. हे अभियान आणखी तीव्र करण्यासाठी तरुणांनाही पुढे यावे लागेल. 


जर एका शिक्षित तरुणाने एका अशिक्षिताला साक्षर केले तर देशभर लवकरच साक्षरतेची पताका पुन्हा फडकेल. साक्षरता अभियान एक शैक्षणिक चळवळ आहे, जिची घोषणा आहे. प्रत्येकाने एकाला शिकवावे." प्रत्येकाने ही तपश्चर्या केली तर ही चळवळ यशस्वी होईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद