पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा |PAYAKHALACHE GAVAT BOLU LAGLE TAR MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पायाखालचे गवत बोलू लागले तेव्हा मराठी निबंध बघणार आहोत. बागेत गेलो की, आम्ही पायातील चपला काढून हिरव्या गवतावर धावतो. ओल्या गवताचा स्पर्श अगदी हवाहवासा वाटतो. सगळा थकवा क्षणात पळून जातो.
पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या पायाखालच्या गवताकडे कुणाचेही लक्ष नसते. सगळे येणारे-जाणारे त्याला तुडवत असतात. त्यामुळे पायाखालचे हे गवत एकदा बोलू लागले, "अरे किती दृष्ट आहात तुम्ही. मी तुमची एवढी सेवा करतो.
पण तुम्ही माझ्याकडे कधी वळूनही बघत नाही. तुम्ही माझ्याशी गप्पा मारत नाही. कारण तुमच्या दृष्टीने मी पायाखाली तुडवण्यासाठीच असलेली एक वस्तू आहे. "उन्हात अनवाणी पायांनी जाणाऱ्यांच्या पायाला चटके बसतात. कधी कधी खडेही टोचतात.
त्याच रस्त्याच्या बाजूला मी असलो तर त्यांना त्रास होत नाही. तुम्ही माझ्याकडे नीट पाहिलेत, तर तुम्हांला माझ्यावर फुललेली बारीक बारीक नाजूक सुंदर फुले दिसतील. इतर झाडे, वेली, रोपे लावण्यासाठी तुम्हांला खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप खर्च होतो. माळ्याला देखभाल करावी लागते. माझ्यासाठी असे खर्च करावे लागत नाहीत.
"प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू यांच्या जगण्याला तेव्हाच अर्थ प्राप्त होतो, जेव्हा त्यांचे जगणे हे केवळ स्वतःसाठी नसते, तर दुसऱ्यासाठी असते. तेव्हा एक लक्षात ठेवा, समाजात जो कोणी दुसऱ्यासाठी झटत असेल त्याला कधी कमी लेखू नका. मीसुद्धा तुम्हां मानवांची - समाजाची सेवा करीत आहे." मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
[शब्दार्थ : अनवाणी- barefoot. मुदखा जी-जान से कोशिश करना। कमी लेखणे- to look down upon, to consider inferior. मोधु isg. छोटा मानना। ]