आज शिवाजीराजे असते तर...मराठी निबंध | Aaj shivajiraje aste tar Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आज शिवाजीराजे असते तर. मराठी निबंध बघणार आहोत.आजची आपल्या देशातील राजकीय अंदाधुंदी पाहिली की वाटते, येथे शिवाजीराजांसारखाच नेता हवा. आज असे एकही क्षेत्र नाही की, जेथे भ्रष्टाचार नाही.
आज शिवाजीराजे महाराष्ट्रात आले, तर राजांना दुःख होईल; कारण राजे अत्यंत न्यायप्रिय होते. खाली पडलेला आंबा मालकाला न विचारता उचलण्याचा गुन्हा केला, म्हणून त्यांनी आपल्या गुरूंना, प्रत्यक्ष दादोजी कोंडदेवांनाही सजा केली होती. असे हे शिवाजीराजे स्वार्थी सत्ताधीशांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत.
शिवाजीराजांच्या राज्यात गुन्हेगारीला जागा नव्हती. आज सर्वत्र असलेली गुन्हेगारी राजांना चालणार नाही. ते भ्रष्टाचाराला कायमचे हद्दपार करतील. मराठी राज्यभाषा झालेली पाहून राजांना आनंद होईल; पण आपल्या कानांवर पडणारी भाषा शुद्ध नाही, म्हणून ते दुःखी होतील.
हे सारे पाहून राजे सत्ता आपल्या हाती घेतील. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवर ते गुणी माणसांची नेमणूक करतील. राजांचा सर्व कारभार कसा पारदर्शक असेल ! तेथे भ्रष्टाचाराला जागा नसेल. महाराजांचे आपल्या प्रजेवर खरे प्रेम होते. तेथे जात, पात, धर्म कशाला थारा नव्हता. शिवाजीराजे अवतरले तर लोकांचे राज्य निर्माण होईल.
लोकांच्या सुखासाठी झटणारे शिवाजीराजे नवनवे उपक्रम सुरू करतील. आपल्या प्रजेच्या सुखाचाच ते रात्रंदिवस विचार करतील. प्रजेच्या सुखात संकट उभे करणाऱ्यांना ते कडक शासन करतील.
आजच्या विज्ञान युगात विज्ञानाचा उपयोग प्रजेच्या हितासाठी कसा होईल, याचाच ते विचार करतील. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करतील .मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
[शब्दार्थ : राजकीय अंदाधुंदी- political chaos, confusion. अंधाधुंधा, अ२।४ता. राजनैतिक अव्यवस्था, गड़बड़ी। हद्दपार करतील- will deport. S६ वटावी ४शे, ४भूगथी. उजेडी ना५शे. जड़ से मिटा देंगे। पारदर्शक- transparent. पा२६. आरपार दिखाई देने वाला, स्वच्छ। थारा- (here) importance, place. स्थान. स्थान, महत्त्व।।