आमचे घर मराठी निबंध | Aamche Ghar Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमचे घर मराठी निबंध बघणार आहोत. आमचे घर खूप जुने आहे. आज आम्हांला शहरात राहावे लागत असले, तरी आमच्या घरातील सर्वांचे किहीम गावातील आमच्या घरावर खरे प्रेम आहे. आमचे हे घर साधे मातीचे आहे, पण आजही ते भक्कम आहे.
शहरातील काही सुखसोयी या घरात नाहीत, तरी आम्हांला घर खूप प्रिय आहे. घर आणि घराचा परिसर खूप मोठा आहे. घरातील जमीन शेणाने सारवलेली असते. घराभोवती फळझाडे आणि फुलझाडे आहेत.
प्रत्येक सुट्टीत आम्ही सगळेजण या आमच्या घराकडे धाव घेतो. माझे दोन्ही काका, आत्या आणि त्यांच्या घरची सर्व माणसे अशी पंचवीस-तीस माणसे आम्ही एकत्र येतो. तेव्हा घरात नंदनवन अवतरल्याचा आनंद आम्हांला होतो.
आजीच्या या घरातील देवघरही मोठे आहे. देवांसाठी आम्ही टोपल्या भरून फुले आणतो. तेथील मंगल, पवित्र वातावरण मनाला मोहवून टाकते. आमच्या या घरात वीज नाही. घराला मोठे अंगण आहे. अंगणात मोठी विहीर आहे.
मोकळ्या अंगणात खेळताना, बागडताना वेळ केव्हा आणि कसा जातो ते कळत नाही. आजीच्या घरी सर्व स्वयंपाकपाणी चुलीवर होते. त्यामुळे तेथील जेवणाला छान चव येते. शिवाय आजी, आत्या जे नवे नवे पदार्थ करतात त्यापुढे सारे पिझ्झा, बर्गर फिके पडतात.
रात्री चांदण्यात घरातील मोठी माणसे लहानपणच्या आठवणी काढून गप्पा मारतात. मला आमचे हे घर अधिकच प्रिय आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
[शब्दार्थ : सुखसोयी-amenities. सुमस॥43. सुख-सुविधाएँ। नंदनवन-a garden in heaven. नहनवन, स्वर्ग. इंद्र का उपवन, स्वर्ग। फिके पडतात-