एका जखमी पिल्लाचे मनोगत मराठी निबंध | AKA JAKHAMI PILLACHE MANOGAT MARATHI NIBANDH

एका जखमी पिल्लाचे मनोगत मराठी निबंध | AKA JAKHAMI PILLACHE MANOGAT MARATHI NIBANDH

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका जखमी पिल्लाचे मराठी निबंध बघणार आहोत. एका पक्ष्याचे केविलवाणे ओरडणे ऐकू आले म्हणून, मी धावत अंगणात गेलो. झाडाखाली एक पक्षी जखमी होऊन पडला होता. झाडावर एक पिल्लू आर्त स्वरात आवाज करीत होते, उडण्याच्या धडपडीत तेही खाली पडले. 


जवळच राहणाऱ्या एका 'पक्षी अभ्यासक' व्यक्तीला मी बोलावून आणले. त्यांनी त्या पक्ष्याला आणि त्याच्या पिल्लालाही आपल्या दवाखान्यात नेले. माझ्या मनातून पक्ष्यांबद्दलचा विचार जात नव्हता. मला वाटलं की ते पिल्लू माझ्या खोलीच्या खिडकीवर बसून माझ्याशी बोलत आहे.


पिल्लू म्हणाले, "तुझे आभार मानायला मी येथे आलो आहे. तू वेळेवर योग्य व्यक्तीला बोलावून आणलेस, म्हणून आज माझ्या आईचे प्राण वाचले आहेत. अरे ! आई माझ्यासाठीच खाणे आणण्यासाठी बाहेर गेली होती, तेव्हा कोणीतरी दुष्टाने तिला जखमी केले. 


धडपडत ती आमच्या घरट्यापर्यंत आली. तिने मला खाऊ घातले आणि ती झाडाखाली पडली व तिच्यानंतर मीही. "मी अजून लहान आहे. मला उडताही येत नाही, मग माझी उपासमार झाली असती. पण त्या माणसाने माझी काळजी घेतली मला कापसात ठेवले. 


ऊब राहावी म्हणून तेथे एक दिवा लावून ठेवला. काचेच्या नळीने तो मला पाणी व दूध पाजत होता. तितकीच माझ्या आईचीही तो काळजी घेत आहे. मला खात्री आहे की, चार-पाच दिवसांत माझ्या आईला बरे वाटेल आणि ती आकाशात झेप घेईल.


मला एकाच गोष्टीचे नवल वाटते. माझ्या आईला जखमी करणारा माणूसच आणि आम्हांला जीवदान देणाराही माणूसच ! मग कोणावर विश्वास ठेवायचा?" आवाज बंद झाला म्हणून मी खिडकीकडे बघितले पण तेथे पिल्लू नव्हते. उदया त्या पक्षिमित्र काकांच्या घरी जायचे, असा निश्चय करून मी झोपी गेलो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : केविलवाणे-pitiable. ना. दर्दनाक। पक्षी अभ्यासक-a bird watcher, पक्षीओनी सारसंभाग लेनार. पक्षियों की देखभाल करने वाला। उपासमार - starvation. भूखमरी, भूखों मरने की स्थिति। ऊब- warmth. suj. गरमाहट।]