क्रिकेटच्या मैदानाची कैफियत मराठी निबंध | Cricket Maidanachi Kaiphiyat Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण क्रिकेटच्या मैदानाची कैफियत मराठी निबंध बघणार आहोत. काय वाटते? - आज पैसा खूप मिळतो; पण निष्ठा तीच आहे का?] मुंबईत मामाकडे गेलो होतो तेव्हा त्याला म्हटले की, मला मुंबईतले क्रिकेटचे मैदान बघायचे आहे.
मामाने मला ब्रेबर्न स्टेडियममध्ये नेले. मोकळे क्रीडांगण माझ्यासमोर पसरलेले होते. मला भास झाला, जणू क्रीडांगण माझ्याशी बोलत आहे “मुला, तू येथे मला पाहण्यासाठी आलास, त्यामुळे मला फार आनंद झाला. कारण हल्ली येथे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जात नाहीत.
आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आता नवे स्टेडियम तयार केले आहे. पण मी अजिबात दुःखी नाही. उत्तम क्रिकेट येथे माझ्या अंगावर खेळले गेले आहे. त्यांच्या आठवणीवर मी जगू शकतो. "माझा जन्म इंग्रजांच्या राज्यात झाला. त्यांना क्रिकेटची खूप आवड !
त्यासाठी मला त्यांनी निर्माण केले. त्यापूर्वीचे माझे रूप अगदी खराब होते. क्रिकेटच्या नियमांनुसार मैदान बनण्यासाठी मला खूप त्रास सहन करावा लागला, पण जेव्हा एकाहून एक सरस खेळाडू येथे खेळले, तेव्हा सर्व कष्टांचे सार्थक झाले.
“सी. के. नायडू हे असा काही चेंडू टोलवायचे की बघतच राहावे ! पतौडी, वाडेकर, चंदू बोर्डे यांनीही येथे पराक्रम गाजवले. गावसकर मैदानावर उतरला की, हा आता किती शतके काढणार, याबाबत पैजा लागायच्या. कपिलने गोलंदाजीतील विक्रम येथेच केला.
हल्ली येथे फारसे कसोटी सामने होत नाहीत. तरीपण काही खासगी स्पर्धा-सामन्यांत सचिनला येथे खेळताना पाहण्याचा आनंद मी लुटला आहे. "खरे पाहता, पूर्वीच्या खेळाडूंपेक्षा आजच्या क्रिकेट खेळाडूंना खूप पैसा मिळतो. तरीपण जेव्हा मॅच फिक्सिगचा प्रकार घडतो, तेव्हा सर्व भारतीयांची मने दुःखीकष्टी होतात.
नुकताच भारताच्या तरुण खेळाडूंनी 'चॅम्पियन्स करंडक' जिंकला हे ऐकून माझे वृद्ध मन खूप आनंदित झाले आहे."मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
[शब्दार्थ : क्रीडांगण-playground. in. खेल का मैदान। सार्थक होणेto be fruitful. सार्थ थj. सफल होना। पैजा - bets. शरतो. शर्त, बाजी। कसोटी सामनेtest matches. टेस्ट भेयो. टेस्ट मैच।]