एक अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध | Ek avishmarniya prasang essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एक अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध बघणार आहोत. एकदा आम्ही काही दोस्त गडावर सहलीसाठी गेलो होतो. गडावर जाण्याचा नेहमीचा मार्ग सोडून आम्ही एका पायवाटेने आज निघालो होतो. असे नवे नवे रस्ते शोधून काढण्याची आमच्या दोस्तांना मोठी हौसच आहे.
गप्पांच्या नादात आम्ही खूप खूप चाललो पण गडावर काही पोहोचलोच नाही. खाली पाहिले तर पायवाटही हरवून गेली होती. आणि दिवसही मावळला होता. आता रात्र झाली आहे आणि आपण रस्ता चुकलो आहोत. या सत्याची आम्हांला जाणीव झाली आणि छातीचा ठोका चुकला !
आम्ही एकमेकांचे हात धरले आणि चाचपडत पुढे जाऊ लागलो. जसजसे पुढे जाऊ लागलो. तशी झाडी अधिकच दाट झाली. सगळीकडे काळोख दाटला होता. फक्त रानकिड्यांचे किर्र ओरडणे ऐकू येत होते. आम्ही गडावर पोहोचण्याऐवजी घनदाट जंगलात पोहोचलो होतो.
गाव खूप दूर राहिले होते ! आता घरी कसे परतणार ? घरचे लोक खूप काळजी करणार. त्या जंगलातून गावात निरोप पाठवायलाही काही सोय नव्हती. काय करावे काहीच सुचत नव्हते. भीतीने गाळण उडाली होती ! घशाला कोरड पडली होती. शेवटी एका झाडाखाली बसलो. काही वेळ तसाच सुन्नावस्थेत गेला.
थोड्याच वेळानंतर आम्ही पुन्हा चालू लागलो. वाटेत एक कुटी दिसली. आत डोकावले तर एक आचार्य आणि त्यांचे काही शिष्य मंत्रपठण करीत होते. आम्ही तेथेच थबकलो. आमची चाहूल लागली म्हणून त्यांनी डोळे उघडले. आचार्यांनी आमची चौकशी केली.
आम्हांला बसण्यासाठी आसन दिले. त्यांच्या शिष्यांनी आम्हांला दूध आणि फळे आणून दिली. तेवढ्या रात्री आम्ही त्यांचा आस्वाद घेतला व आचार्यांच्या आदेशानुसार झोपी गेलो. भल्या पहाटे आचार्यांनी आम्हांला उठवले. व ते आम्हांला घेऊन निघाले.
काही अंतर गेल्यावर आचार्य म्हणाले, "या रस्त्याने जा. घरी पोहोचाल." एवढेच बोलून ते मागे फिरले. आम्ही त्या रस्त्याने पुढे गेलो व सुखरूप घरी पोहोचलो. हा प्रसंग मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
शब्दार्थ : छातीचा ठोका चुकला-were scared. (मरा गया. भयभीत हो उठे। किर्र- shrill. ती.. तीक्ष्ण आवाज। घनदाट-dense, thick. घटा॥२. घना। भीतीने गाळण उडाली होती- we were frightened. भयभीत थ६ गया ता. डर के मारे छक्के छूट गए थे। सुन्नावस्थेत- desensitised. शून्यावस्था, शून्यमन७. जड़वत। कुटी-a hut. जुटिर, ग्रूप.. कुटिया। सुखरूप