जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Ghadyal Chi Atmakatha In Marathi Essay
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जुन्या घड्याळाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. टिक टिक टिक' असा टेबलावरील घड्याळाचा आवाज रात्रीच्या शांततेत जरा मोठाच वाटत होता. आजकाल हे घड्याळ अधूनमधून जरा मागेही पडत होते. माझ्या मनात आले की, आता हे जुने घड्याळ टाकून दयावे आणि एखादे नवे सुंदर घड्याळ आणावे.
काय चमत्कार बघा ! माझ्या मनात हा विचार येतो आहे, तोच टिक् टिक् बंद झाली आणि घड्याळ बोलू लागले “अरे मुला, तुझे बरोबर आहे. मी आता म्हातारा झालो. त्यामुळे तुला माझा कंटाळा आला आहे. म्हणून नवीन घड्याळ घेण्याचा विचार तुझ्या मनात आला.
पण एक गोष्ट लक्षात ठेव, गेली चाळीस वर्षे मी तुमच्या कुटुंबाची सेवा करीत आहे. तुझे वडील कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा त्यांना बक्षीस मिळालेल्या पैशांतून त्यांनी मला खरेदी केले होते.
" माझा जन्म भारतातच झाला, पण माझे काही भाग परदेशातून आणले गेले. तुमच्या घरातील महत्त्वाच्या कामात मी तुम्हांला मदत केली आहे. परीक्षेच्या वेळी मोठ्याने गजर करून तुम्हांला जागे केले आहे. माझ्यामुळेच गावाला जाताना तुमची गाडी कधी चुकली नाही.
वक्तशीरपणा हा गुण या घराला मी शिकवला आहे. पण त्या बदल्यात मला काय मिळाले? कधी वेळेवर मला तेलपाणीही झाले नाही.
"अरे मुला, आम्हां घड्याळांचे जनक तुम्ही माणसेच आहात. तुमच्या सोयीसाठी तुम्ही आम्हांला निर्माण केलेत. जेव्हा आम्ही नव्हतो, तेव्हा तुम्हांला वस्तूंच्या सावल्यांवरून वेळेचा अंदाज घ्यावा लागायचा. नंतर घटिकायंत्र आले. वाळूची घड्याळे आली. अखेरीस आमचा शोध लागला आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आमच्यावर अवलंबून राहू लागली.
" आता तुम्ही आमच्या स्वरूपात खूप बदल केले आहेत. प्रथम आमचे जीवन यंत्रावर अवलंबून होते; नंतर तुम्ही आम्हांला विजेची जोड दिलीत व आता तर संगणकाच्या मदतीने आम्ही अधिक अचूक झालो आहोत. पण आजही मानवाची सेवा हाच आमचा जीवनहेतू आहे."
आवाज बंद झाला. घड्याळ बंद पडले होते. दुसऱ्या दिवशी मी त्याला घड्याळजीकडे दुरुस्तीला दिले. नवे घड्याळ विकत घेण्याचा विचार मी मनातून काढून टाकला होता. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
[शब्दार्थ : कुटुंब-family. मुटुंब. परिवार। गजर-ring tone. घंट31. घंटी की आवाज। वक्तशीरपणा-regularity. नियमितता. नियमितता। जनक- creator. सई3. बनाने वाला। घटिकायंत्र-time-machine. घड़ियाण. समय दर्शक पात्र। अवलंबून-depend. निर्भर, सवलत. निर्भर। जोड - support. साधार, टेओ. जोड़ना। अचूक- correct. योस. त्रुटिहीन। दुरुस्त-repair. सभा२७भा. मरस्मत।]