मी शिक्षक झालो तर…मराठी निबंध | if i were a teacher essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी शिक्षक झालो तर… मराठी निबंध बघणार आहोत. आमच्या वर्गातील दीपाने काल टेनिसच्या मैदानावर मोठा पराक्रम गाजवला होता. वर्तमानपत्रातही ते वृत्त छापून आले होते. त्यामुळे सगळा वर्ग आज विजयाच्या मूडमध्ये होता आणि दीपाचे कौतुक करीत होता.
गणिताच्या वडके मॅडम वर्गात केव्हा आल्या ते कळलेच नाही. वर्गातील गोंधळामुळे बाई रागावल्या. त्यांनी तासभर आम्हांला 'शिस्तीने कसे वागावे?' यावर भाषण दिले. त्या तासाला जे प्रकरण त्या शिकवणार होत्या, ते शिकवून झाले, असे त्यांनी जाहीर केले.
ही आम्हांला दिलेली शिक्षा होती. पण वर्गात गडबड का झाली? हे त्यांनी एकदाही विचारले नाही वा समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. विदयार्थ्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी खूप आदर असतो. अगदी बालवयात तर मुले एक वेळ आईचे ऐकत नाहीत, पण बाईंचे ऐकत असतात.
मी शिक्षिका झाले तर प्रथम मी माझ्या विदयार्थ्यांना चांगले समजून घेईन. त्यांच्या आनंदात सहभागी होईन. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन. अभ्यास अगदी सोपा करून सांगेन. एकूण काय, तर त्यांना मी हवीहवीशी वाटेन अशीच वागेन.
आम्ही विदयार्थिनी आमच्या शिक्षकांचा मूड बरोबर ओळखतो. आज बाई आनंदी मूडमध्ये आहेत की चिडलेल्या आहेत, हे आम्ही ओळखतो आणि मग एकमेकींना खुणा करतो. मी शिक्षिका झाले, तर मी माझ्या मूडचा वर्गावर परिणाम होऊ देणार नाही.
मी वर्गात शिरताना माझ्या मनातील सर्व चिंता वर्गाबाहेर ठेवीन. कारण माझी कर्मभूमी ही मला नेहमी हसतीखेळती हवी. मी शिक्षिका झाले तर एक गोष्ट अगदी कटाक्षाने करीन. सर्व विदयार्थ्यांना समान पद्धतीने वागवीन. जर मी शिक्षिका झाले तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवीन की शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरावे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
[शब्दार्थ : घटक- unit, lesson. ५08. इकाई। सहभागी होणे- to participate, to join. (म देवो. भाग लेना। अडचणी- difficulties. हिना, तseीई. कठिनाइयाँ। कटाक्षाने-particularly. स. रीने. विशेष रूप से।]