माझा मित्र वर निबंध Maza mitra essay in marathi

 माझा मित्र वर निबंध Maza mitra essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा मित्र मराठी निबंध बघणार आहोत. अशोकची आणि माझी मैत्री हा अनेकांना आश्चर्याचा विषय वाटतो. अशोक दहावीत आहे, पण तो मराठी माध्यमात एका रात्रशाळेत शिकतो. दिवसा तो एका छापखान्यात काम करतो. त्याचा स्वभाव इतका गोड आहे की, माझी त्याच्याशी सहज मैत्री जमून गेली.


अशोकची व माझी योगायोगानेच ओळख झाली. मी व अशोक आठव्या इयत्तेत शिकत होतो. अशोक जेथे काम करतो, त्या छापखान्यात माझ्या बाबांनी लिहिलेले एक पुस्तक छापले जात होते. त्या पुस्तकाचे 'फायनल प्रूफ' घेऊन अशोक आमच्या घरी आला होता. 


तेव्हा मी विज्ञान विषयाचा अभ्यास करीत होतो. पुस्तकातील आकृती पाहून अशोकने मला प्रश्न विचारला. मी त्याचे उत्तर दिले. त्या प्रसंगापासून अशोक हा आमच्या घरातीलच एक झाला. त्याला आईवडील नव्हते. अशोक मामाकडे राहत होता. 


शिक्षणाची खूप आवड असल्याने तो रात्रशाळेत जाऊन शिकत होता. पण पुस्तके विकत घेणे त्याला शक्य नव्हते. अभ्यासातील अडचणी तो माझ्या आईकडून समजावून घेत असे. त्या बदल्यात तो आईची लहानसहान कामे करीत असे.


अशोकला रविवारी सुट्टी असते. मग तो दुपारीच आमच्याकडे येतो. अभ्यास झाल्यावर आम्ही खेळतो किंवा फिरायला जातो. अशोकने मला सायकल चालवायला शिकवली, पोहायलाही शिकवले. असा हा माझा सच्चा मित्र मोठ्या मनाचा आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

[शब्दार्थ : योगायोगाने- by chance, accidently. संठोगशात. संयोग से। बदल्यात - in return. असामा. बदले में।]