मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध | Me Pahilela Prani Sangrahalay Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध बघणार आहोत. सुट्टीत आम्ही हैदराबादला गेलो होतो, तेव्हा तेथील प्राणिसंग्रहालय बघायला गेलो होतो. आम्ही सकाळी लवकर घरातून निघालो. संग्रहालय सकाळी नऊला उघडले.
तिकिटे काढून आम्ही संग्रहालयात प्रवेश केला. तेथे 'कसे वागावे आणि कसे वागू नये' याची मोठी नियमावली लावलेली होती. प्राणिसंग्रहालयात काही नैसर्गिक आणि काही कृत्रिम जंगल निर्माण केले होते. प्रेक्षकांना फिरावयास मिळावे म्हणून रस्ते बांधले होते. परंतु इतर भागात खूप झाडी होती.
प्राण्यांसाठी भरपूर मैदान राखले होते. पिंजऱ्यातही छोटी झुडपे होती. त्यामुळे पिंजऱ्यात अगदी सिंहही खुशीत होता. जोडी-जोडीने ते राहत होते. एका पिंजऱ्यात काही छोटे बछडे खेळत होते. पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत होते. ते बछडे फारच सुंदर होते.
दुसऱ्या पिंजऱ्यात पट्टेदार वाघ, बिबटे झोपले होते. एका पिंजऱ्यात पांढरा वाघ व त्याची मादी होती. या हिंस्र प्राण्यांच्या जागा आणि प्रेक्षक यांच्यात मोठे खड्डे खणलेले होते, त्यांत पाणी सोडलेले होते. काही ठिकाणी कृत्रिम तळी निर्माण केलेली होती.
एका मोठ्या पाणथळ जागेत गेंड्याची जोडी होती. हरणे, काळविटे, रानगाई, सांबर असे कितीतरी प्राणी तेथे पाहायला मिळाले. गंमत वाटली ती माकडांच्या, वानरांच्या पिंजऱ्याभोवती ! तेथेही अनेक प्रकारची माकडे होती आणि ती उड्या मारून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत होती.
प्रेक्षकांच्यात आणि त्यांच्यात दोस्तीचे नाते निर्माण झाले होते. प्राणिसंग्रहालयाच्या जवळच पक्ष्यांसाठी एक अभयारण्य होते. तेथे इतक्या प्रकारचे पक्षी होते की ते पाहून खूप आनंद वाटला पण अशा क्षणी मनात एक विचार आला की, खरोखर या प्राण्यांना पिंजऱ्यात कोंडणे योग्य आहे का? मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
[शब्दार्थ : प्राणिसंग्रहालय / अभयारण्य-a z00. प्राणीसंग्रहालय. चिड़ियाघर। बछडे - cubs. सिंडन जय्य. सिंह के बच्चे। बिबटे-leopards, panthers. यित्ता. तेंदुआ। हिंम्र- wild, violent. सि., पात४. हिंसक, घातक। कृत्रिम-artificial, manmade. नदी, बनावटी. बनावटी। सांबर - an elk or antelope. साब२. हिरन (सींगवाला)।]