निवृत्त शिक्षकाचे मनोगत मराठी निबंध | Nivratt Siksakache Manogat Marathi Essay
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निवृत्त शिक्षकाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. "जातिवंत शिक्षक कधी निवृत्त होतच नसतो. वयाची अट्ठावन वर्षे झाली म्हणन शाळेची नोकरी संपली, पण विदयार्थ्यांची सेवा कधी संपतच नाही.
म्हणून तर मी माझ्या या छोट्याशा घराचे नाव 'गुरुकुल' ठेवले आहे आणि आमच्या घराची दारे विदयार्थ्यांसाठी उघडीच असतात. "शिक्षकी व्यवसाय हा मी आवडीनेच स्वीकारला होता. त्यामुळे शाळेतील पस्तीस वर्षांच्या नोकरीत मला कधीही कंटाळा आला नाही.
दरवर्षी नवीन विदयार्थी येत असत. एखादया हुशार विदयार्थ्याला गणितातील अवघड उदाहरणे सांगताना जो आनंद मिळे, त्यापेक्षा शतपट अधिक आनंद एखादया सर्वसामान्य विदयार्थ्याला शिकवताना मिळे.
"रोज शिकायला येणारी ही मुले आमचे घर भरून टाकतात. त्यांच्याकडून शाळेत घडणाऱ्या गमतीजमती ऐकताना आम्हीपण रंगून जातो. या विदयार्थ्यांच्या सहवासात आम्हाला आमच्या वाढत्या वयाची आठवणही राहत नाही. आजची मुले खूप हुशार आहेत. त्यांच्या सहवासात आम्ही त्यांची भाषा, त्यांचे शब्द शिकतो.
"काही विदयार्थी परदेशी शिकत आहेत. वेळोवेळी दूरध्वनी करून वा कधी वेळ काढून ते मुद्दाम मला भेटायला येतात. आपली प्रगती ऐकवतात, आपली विद्यार्थिदशा कृतज्ञतेने आठवतात आणि मग मनात येते – 'मी खरा श्रीमंत आहे.' "मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
[शब्दार्थ : जातिवंत शिक्षक-a born teacher. ४मत शिक्ष. जन्मजात शिक्षक। सहवास- company. साथ, सहवास. संगति, साथ। कृतज्ञता-gratitude. इतशता, सामा२. आभार, एहसानमंदी।]