पौर्णिमेच्या चंद्राचे मनोगत मराठी निबंध | pairnimechya chandrache manogat essay marathi

 पौर्णिमेच्या चंद्राचे मनोगत मराठी निबंध | pairnimechya chandrache manogat essay marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  पौर्णिमेच्या चंद्राचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. अभ्यास करण्याचा कंटाळा आला म्हणून मी थोडा वेळ गच्चीत आले. माझे आकाशाकडे लक्ष गेले. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता. मी खूप वेळ त्याच्याकडे पाहत राहिले तेव्हा मला वाटले की, तो चंदामामा माझ्याशी बोलत आहे.


"अग, किती न्याहाळते आहेस तू मला. खरं तर अगदी लहानपणापासून तुझी-माझी ओळख आहे. आज पौर्णिमा आहे म्हणून माझे पूर्ण बिंब तुला दिसत आहे. म्हणूनच तुझी नजर माझ्यावर खिळली आहे. मला तुम्हां माणसांची नेहमी गंमत वाटते. तुम्ही कधी माझे कौतुक करता, तर कधी मला नावे ठेवता.


"तुमच्या विद्वानांच्या मते, मी परप्रकाशी आहे. सूर्यासारखा मला स्वतःचा प्रकाश नाही. सूर्य हा तारा आहे. तर मी एक उपग्रह आहे. सूर्याचे काम वेगळे आणि माझे काम वेगळे. खरं सांगू का? मला प्रखर प्रकाश आवडत नाही. माझे चांदणे आनंददायक आहे. माणसाने आपले व्यक्तिमत्त्व असेच प्रसन्न ठेवावे.


"तुमचा प्रतिनिधी 'राकेश शर्मा' माझ्याकडे आला होता, तेव्हा मला केवढा आनंद झाला होता. कारण तुमची पृथ्वी आणि मी, आम्ही एकाच आकाशगंगेत आहोत. पण येथून परत गेलेल्या माणसांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. कुणी म्हणतात, मी भाजलेल्या पापडासारखा आहे. 


कुणी म्हणतात, माझ्या ठिकाणी पाणी नाही. राहण्यासाठी मी योग्य नाही. भारताने काही वर्षांपूर्वी एक चांद्रयान माझ्याकडे पाठवले होते. त्यांनी माझ्या न दिसणाऱ्या बाजूचा अभ्यास करायचे ठरवले आहे. त्यात ते कितपत यशस्वी झाले, काही कळले नाही !" 


आईची हाक आली, "अग, इतका वेळ काय करतेस गच्चीत?" आईला काय सांगू, ती मला वेड्यात काढील. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : गच्ची- terrace. छत, घाj. मकान की छत। बिंब-the disc (of the moon). यंद्रभ31, लिंग. बिंब, चंद्रमंडल। उपग्रह - satellite, secondary planet. उपग्रह. उपग्रह। यान- spacecraft. यान. यान।]