शब्द हरवले तर मराठी निबंध | Shabd Harvale Tar Marathi Nibandh

 शब्द हरवले तर मराठी निबंध | Shabd Harvale Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  शब्द हरवले तर मराठी निबंध बघणार आहोत. आपल्याजवळचे शब्द हरवले तर आपण रडून वा ओरडून लक्ष वेधून घेऊ शकू. पण अशाने सगळ्या भावना कशा व्यक्त करणार? मग हावभावांची भाषा स्वीकारावी लागेल.


'शब्द' ही आपल्याला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. शब्दांमुळेच आपण एका पिढीचा वारसा दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. एखादा शास्त्रज्ञ संशोधन करतो. संशोधनाचे काम पूर्ण होत नाही. पण त्याने शब्दांत लिहून ठेवलेल्या संशोधनाचा पुढील पिढीला उपयोग होतो. 


आज हजारो वर्षांपूर्वीचे आपले लेखन हे आपल्याला पूर्वजांची माहिती सांगतात. आपले रामायण, महाभारत, वेद, इंग्रजीतील शेक्सपिअरचे ग्रंथ, वर्डस्वर्थचे काव्य आजही आपल्याला आनंद देऊ शकते, ते शब्दांच्या द्वाराच!


शब्द हे जसे आनंद देतात, तसेच ते दुसऱ्याला दुखवतातही. म्हणून 'शब्द हे शस्त्र आहे' असे म्हटले जाते. शब्दांनी मने जुळली जातात, तशी एखादया शब्दाने मने तुटू शकतात. काही जणांचे कठोर शब्द हे दुसऱ्याच्या मनाला दुःखी करू शकतात.


'शब्द देणे' या दोन शब्दांना फार मोठा अर्थ आहे आपण एखादयाला शब्द देतो म्हणजे दिलेले वचन पाळतो. त्यामुळे असे शब्द हे फार मोठा आधार असतात. संस्कृत सुभाषितकार म्हणतात, 'सज्जनांचा शब्द ही दगडावरची रेघ आहे'. काही शब्दांचे सामर्थ्य फार मोठे असते. 


सुभाषचंद्रांची सेना 'चलो दिल्ली' या आदेशावर भारताकडे निघाली होती. 'वंदे मातरम्' या दोन शब्दांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यास फार महत्त्व आले होते आणि 'चले जाव' आणि 'भारत छोडो' या गांधीजींच्या चार शब्दांनी इंग्रजांचे साम्राज्य डळमळले होते. 


असे समर्थ शब्द म्हणजे मंत्रच असतात. म्हणून शब्द हे अनमोल आहेत. ते हरवले तर आपण खऱ्या अर्थाने भिकारी होऊ. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : हावभावांची भाषा - language of gestures. विमावना शारा. हावभाव या इशारों की भाषा। अनमोल-priceless. मूल्यवान. बहुमूल्य, अमूल्य। पिढी-generation. पेढी, वंश. पीढ़ी। वारसा- heritage. पारसी. विरासत। शब्द देणेto promise. क्यन मा. वचन देना। डळमळले- became shaky. मग. डगमगाना, लड़खड़ाना।]