सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya mavala nahi tar nibandh in Marathi.

  सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी | Surya mavala nahi tar nibandh in Marathi.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सूर्य मावळला नाही तर मराठी निबंध बघणार आहोत. ही कल्पना योग्य की अयोग्य?] उन्हाळ्याचे दिवस होते. उकाड्याने जीव हैराण झाला होता. आकाशातील ऊन ओकणाऱ्या सूर्याकडे पाहवत नव्हते. अशा वेळी मनात एक भीती डोकावली, 'हा सूर्य मावळलाच नाही तर...' सूर्य मावळलाच नाही, तर सूर्य उगवणार कसा? रात्र झाली नाही, तर दिवस होणार कसा? कालचक्र थांबेल. 


रम्य पहाट अनुभवता येणार नाही. रात्रीच्या अंधारात चांदोबा आणि त्याच्या चांदण्या यांची मौज लुटता येणार नाही. सूर्य मावळलाच नाही, तर पक्षी आपल्या घरट्यांकडे कसे परतणार? संध्याकाळ झाली नाही, तर कामावर गेलेली माणसे आपापल्या घरी कशी परत येणार? 


रात्र झालीच नाही, तर विसावा मिळणार नाही आणि सकाळचे चैतन्यही प्राप्त होणार नाही. सूर्य सतत तळपत राहिला, तर त्याची दाहकता असह्य होईल. नदीनाल्यांतील पाणी आटेल. कारण, पाण्याची सतत वाफ होत राहील. सर्व सजीवांना आपले जीवन जगणे कठीण होईल. 


सूर्य मावळलाच नाही तर अंधार होणारच नाही. मग विजेचे दिवे लावण्याची गरज राहणार नाही. रात्र होणार नाही, अंधार होणार नाही, मग विजेच्या दिव्यांच्या रोषणाईची मजा कशी येणार? रात्र नाही म्हणजे झोप नाही. झोपेविना माणसे अशी किती दिवस राहणार? 


शेवटी ती दिवसाची झोपू लागतील. पण सतत प्रकाशामुळे शांत झोप सुद्धा मिळणार नाही. घरांतील गृहिणींचे सर्वांत जास्त हाल होतील. त्यांना सर्व मंडळींसाठी सारखे राबावे लागेल. विश्रांतीचा काळ येणार नाही.


सूर्य सतत तापत राहिला, तर उष्णतामान वाढत जाईल. थंडावा येणार नाही. फुले सुकून जातील. रात्री फुलणारी फुले कशी फुलणार? माझ्या मनात आले की, आपल्या येथे सूर्य मावळत नाही. म्हणजे सूर्य कोठेतरी उगवत नसेल. पृथ्वीच्या फिरण्यामुळे रात्रंदिवस हे चक्र सुरू आहे. 


मग पृथ्वीच फिरायची थांबली आहे का? शास्त्रज्ञ, संशोधक संशोधनाला लागतील. मग कुणीतरी वसुधेची समजूत काढेल. मग वसुंधरेला गती येईल आणि झटकन सूर्य मावळेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



[शब्दार्थ : चैतन्य - energy; enthusiasm. येतना, शति. चेतना, शक्ति। दाहकता- heat. २भी. गर्मी। असहय- intolerable; unbearable. असत्य. जो सही न जा सके। वसुधा- earth. पृथ्वी. पृथ्वी।]