आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे मराठी निबंध | Aakanksha Jithe Gagan Tengne Marathi Nibandh

 आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे मराठी निबंध | Aakanksha Jithe Gagan Tengne Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे मराठी निबंध बघणार आहोत. आकांक्षा म्हणजे इच्छा! मनाच्या गाडीचं इंधन, ऊर्जा. या ऊर्जेच्या शक्तीवर मनाची गाडी सुसाट वेगाने धावते. ते इंधनच नसेल तर? जीवनाची आगगाडी पॅटफॉर्मवर थांबूनच राहील. 


तिला वेग कुठून येणार? आकांक्षा जेवढी मोठी तितका प्रगतीचा वेग जास्त. ईश्वराने ही सजीवसृष्टी निर्माण केली. साऱ्या सजीवांसोबत मानवही इथे आला. पण त्यानं एकट्यानेच फक्त आपली उत्क्रांती घडवून आणली ती याच आकांक्षेच्या बळावर! ...


निसर्गातील साऱ्या गोष्टींचे अनुकरण तो करू लागला. पक्ष्याचे उडणे, माशाचे पोहणे, हरणाचे पळणे... यांनी त्याच्या आकांक्षा पल्लवित केल्या. राईट बंधूंचे पहिले आकाशात उडण्याचे प्रयत्न विफल झाले पण लवकरच ह्या साऱ्या गोषी त्याला गेम लाया आज तर अवकाशात वस्ती करण्याचे मनसबे तो रच लागलाय तेही याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्याच जोरावर. 


उन्नतीचा मूलमंत्र जपताना आकांक्षा, ध्येय गगनाला गवसणी घालणारेच लागते. जग जिंकण्याची आकांक्षा असणारा सिकंदर एखादाच. बाकी सारे आपलं सीमित राज्य चालवण्यात व राखण्यात मग्न असतात. सिकंदर जगज्जेता झाला तो या तीव्र इच्छेने प्रेरित होऊनच... 


मोगलांच्या राजवटीच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या गरीब रयतेला सोडवण्याची आकांक्षा श्रीशिवाजी महाराजांनी केली. हे त्या काळची परिस्थिती पाहता अशक्यप्रायच गोष्ट होती. पण साध्य केली जिद्द व पराक्रम याच्या जोरावर. गिर्यारोहकांना तर प्राणांची बाजीच लावावी लागते. 


केव्हा मत्यूच्या दरीत भिरकावले जाऊ सांगता येत नसतानाही तेनसिंग, बचेंद्रीपालसारखे एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवणारे प्रयत्न करून यशस्वी होतातच. समाजसुधारकांच्या कार्याचेही असेच. शरीरसंपदा, धनसंपदा किंवा कशाचंच पाठबळ नसताना, 


परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल असतानाही त्यांनी मनात धरलेल्या मानवजातीच्या कल्याणाच्या इच्छा गगनालाही ठेंगणे करणाऱ्याच. स्त्रियांचा उद्धार करण्याचं मोठं काम करून महर्षी कर्वे 'भारतरत्न' झाले. पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले, ते याच ध्येयबळावर... 


आकाशावर नेम धरावा तेव्हा झाडाच्या शेंड्यापर्यंत जाईल. आता माणूस दुसऱ्याच सर्यमालिकेवर नेम धरून आहे. कारण आपली सूर्यमालिका हिंडून झाली आहे.  प्रथम वेडगळ वाटणाऱ्या या साऱ्या कल्पना माणसाने मूर्त स्वरूपात आणल्या. कीटकादी प्राण्यांसारखा जीवन चाकोरीत अडकून त्याने आयुष्याची माती केली नाही तर उन्नतीची नवीनवी दालने पादाक्रांत केली.  संत रामदास म्हणतात


“उत्कट भव्य तेंचि घ्यावें।

मिळमिळीत अवघे टाकावें।" 


म्हणून इंग्रजीतही म्हणतात- Not the failure but low aim is the crime. आकांक्षा सफळ करायला लागते तेवढीच ध्येयासक्ती, सतत प्रयत्न, कौशल्य, परिस्थितीशी लढण्याची लढाऊवृत्ती, दैवाची साथ! 


म्हणजेच जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे त्रिगुण! अडथळे येणारच, अपयशही शक्य आहे तरी वाटचाल करायची हे अवघड काम करणारेच मोठे होतात. आकाशापेक्षाही! [अन्यथा, कुसुमाग्रजांच्या भाषेत किनारा तुला पामराला!']मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद