लोकसंख्या-शिक्षण : एक गरज मराठी निबंध | Lokshnkhya-Shikshn : Ak Garaj Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकसंख्या-शिक्षण : एक गरज मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण लोकसंख्या-शिक्षण : एक गरज असलेले दोन निबंध बघणार आहोत आज आपण लोकसंख्या-शिक्षण : एक गरज असलेले दोन निबंध बघणार आहोत आपला भारत देश 'गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे; कारण जगाची लोकसंख्या आज ५०० कोटींच्या वर गेली आहे आणि आपण ८५ कोटी ही मर्यादा ओलांडली आहे;
त्यामुळे आपल्या देशापुढे असणाऱ्या अनेक गंभीर समस्यांपैकी 'लोकसंख्येची बेसुमार वाढ' ही एक गंभीर समस्या आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी माल्थसने लोकसंख्यावाढीचा अभ्यास करून जे विचार मांडले होते, ते किती यथार्थ होते, याचा प्रत्यय आम्हाला येऊ लागला आहे.
माल्थसने म्हटले होते की, 'कोणत्याही देशाची लोकसंख्या ही साधारणत: दर पंचवीस वर्षांनी दुप्पट होते. मात्र अन्नधान्य व इतर सोयी त्या प्रमाणात वाढत नाहीत. त्यामुळे महागाई व उपासमारीला तोंड द्यावे लागते. म्हणून लोकसंख्या मर्यादित ठेवण्यावर भर दिला पाहिजे.'
'आम्ही भारतीय मात्र २१ व्या शतकांत प्रवेश करताना एक शतक कोटी लोकसंख्यां घेऊन प्रवेश करणार असे भविष्य दिसते. या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येवर निर्बंध घालणे अत्यावश्यक आहे. म्हणून 'लोकसंख्या-शिक्षण' ही एक गरज निर्माण झाली आहे.
लोकसंख्या-शिक्षणाची व्याख्या साधारणपणे अशी करता येईल की, "प्रजोत्पादनक्षम गटात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करून त्यांच्यामध्ये आपल्या सुखी व समृद्ध जीवनासाठी तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी स्वत:च्या कुटुबांच्या योग्य त्या आकाराविषयी विचार करण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजे लोकसंख्या-शिक्षण होय."