साक्षरता काळाची गरज निबंध मराठी | Saksharata Kalachi Garaj Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण साक्षरता काळाची गरज मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण साक्षरता काळाची गरज असलेले दोन निबंध बघणार आहोत जगातली एक आदर्श लोकशाही' म्हणून आपण भारताचे वर्णन करतो. या पार्श्वभूमीवर भारतात ६०% निरक्षरांची संख्या ध्यानात घेतली तर, लोकशाहीच्या मूलभूत आव्हानांपैकी निरक्षरता हटवणं हे एक आव्हान आहे, ही काळाची गरज आहे.
निरक्षरता हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासातील अडसर आहे, तो ' एक सामाजिक रोग आहे. माणसाच्या 'स्वयंनिर्णय घेण्याच्या क्षमतेलाच निरक्षरता मारून टाकत असते. म्हणून खऱ्या अनि मतदानाचा अधिकार - बजावण्यासाठी मनुष्य सबळ होतो, समर्थ होतो, आपल्या आयुष्याला आकार देऊ शकतो.
दारिद्र्याच्या शृंखला तोडू शकतो. बेकारीच्या पाशातून बाहेर पडू शकतो. महात्मा गांधीजींनी म्हटले होते. 'लोकांची निरक्षरता हे भारताचे पाप आहे व तिचे उच्चाटन होणे आवश्यक आहे.' आजही ते पाप व ती शरमेची गोष्ट घेऊनच देश जगत आहे.
कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी तेथील नागरिक सुशिक्षित, सुसंस्कारित, श्रमशील व उत्पादनक्षम असणे आवश्यक असते. यासाठी शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध व्हायला पाहिजे. भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी म्हटले होते की, 'विकासरूपी सूर्याची किरणे त्या ठिकाणीच अधिक पडतात, ज्या ठिकाणचे लोक शिकलेसवरलेले असतात.'
शंभर वर्षांपूर्वी म. जोतीराव फुल्यांपासून देशभराच्या समाजधुरीणांनी आपल्या देशात 'सार्वत्रिक सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण हवे असा आग्रह धरलेला आहे. तथापि शिक्षणाचे सार्वत्रीकरण' अजनही होऊ शकलेले नाही. आज शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढलेले असेल, तर गळतीचे प्रमाणही नजरेत भरण्यासारखे आहे.
मागासलेल्या जमातीतील मुले अद्यापही शिक्षणाच्या परीघाबाहेरच आहेत. भारतात आज सुमारे ४.५ कोटी बालकामगार आहेत. दारिद्रयामुळे कुटुंबाच्या निर्वाहासाठी त्यांना काम करावे लागते, त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात.
तसेच साक्षरतेची गंगा देशभर वाहवायची असेल तर प्रौढ शिक्षणालाही गती द्यायला हवी. प्रौढशिक्षणाची कल्पना तशी आपणाला नवीन नाही, प्राचीन काळापासून ती अस्तित्वात आहे. भजन, कीर्तन, भारूड, दंतकथा इ. माध्यमांतून प्रौढशिक्षण चालू होते. परंतु आधुनिक काळात आपले जीवन अधिक गुंतागुंतीचे व व्यापक झाले आहे.
त्यामुळे लोकशिक्षणाच्या पारंपरिक माध्यमाचा प्रभाव आता कमी झाला आहे. इ.१० वी पर्यंतचे मुलींचे शिक्षण मोफत करूनही बराचसा मोठा वर्ग या व्यवस्थेच्या बाहेर आहे. कारण स्त्रियांना परंपरेने दिलेले दुय्यम स्थान हे होय. जर स्त्रिया शिकल्यासवरल्या तर समाजपुरुषाचे अर्धांग विकलांग होणार नाही.
पाश्चात्त्य स्त्रियांच्या तुलनेत भारतीय स्त्री फार मागे आहे. भारत २१ व्या शतकाचे आव्हान स्वीकारीत पुढे चालला आहे. महागाईच्या भस्मासुरात जनता भरडून निघत आहे. आज बहुसंख्य कुटुंबातील एकटा पुरुष अर्थार्जनाच्या बाबतीत कमी पडतो. अशा वेळी सुशिक्षित स्त्री कुटुंबाचा आधार बनते.
स्त्री जर शिकली नाही तर तिला कुटुंबनियोजनाची जाण कशी येणार ? त्यामुळे लोकसंख्येचा फुगवटा कसा थांबणार ? प्रगल्भ मातृत्वाचा लाभ कसा होणार ? आपल्या कुटुंबाला अंधश्रध्दांच्या गुलामगिरीतून कोण सोडविणार? मुलाइतकेच मुलीलाही 'शिक्षण' हवे हे पोथीनिष्ठांना ठणकावून कोण सांगणार?
विज्ञानयुगात पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने कुटुंबसंस्थेला येत चाललेले अस्थैर्य कोण थांबवणार? भारतीय परंपरांना कोण जपणार? यासाठी स्त्रियांच्या साक्षरतेची नितांत गरज आहे. एकीकडे देश ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करीत आहे आणि दुसरीकडे २/३ लोक अज्ञानाच्या अंधारात चाचपडत आहेत.
मग नवभारताची उभारणी कशी होणार? यासाठी राज्यशक्ती' व 'लोकशक्ती' मिळून निरक्षरतेच्या अंधारातून सुटका करून घेतली पाहिजे. पुढील शतकाचे स्वागत कसे करायचे, हे आपण सर्वांनीच ठरवायला हवे. आपल्याच प्रयत्नांवर देशाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
यासाठी प्रत्येक सुशिक्षित नागरिकात निदान एका निरक्षर नागरिकाला साक्षर केले तर संपूर्ण राष्ट्र साक्षर व्हायला कितीसा वेळ लागणार? संपूर्ण साक्षरतेच्या आधारावरच आपली लोकशाही टिकणार आहे. त्यानंतरच जगातली आदर्श व मोठी लोकशाही म्हणवून घेण्यास आपण पात्र ठरू.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
साक्षरता काळाची गरज निबंध मराठी | Saksharata Kalachi Garaj Essay Marathi
एक दिवस आमची मोलकरीण सखुबाई आली तेच मुळी रडत. कारण तसेच होते. सखुबाईंना काल घर होते. आणि आज त्या बेघर झाल्या होत्या. कारण त्यांची निरक्षरता. त्याचे असे झाले- सावकाराकडून त्यांनी कर्ज काढले होते. पण अडचणीमुळे त्यांना वेळेत ते फेडता आले नाही.
सावकाराने कागदोपत्री 'पैसे मुदतीत न फेडल्यास घरावर माझा • हक्क राहणार नाही.' असे लिहून त्याखाली सखुबाईंचा अंगठा घेतला होता. सावकाराने घरावर जप्ती आणून सखुबाईंचे घर ताब्यात घेतले ,होते.
हे मला समजल्यावर मी सखुबाईंना विचारले, अहो सखुबाई, अंगठा देण्याआधी सांवकाराने कागदावर काय लिहिलंय हे तुम्ही पाहिले नाही का?' 'अवं दादा, म्या काय शिकलीसवरली का? मला वाटलं त्यानं समदं नीट केलं आसंल.'
त्यांचं हे बोलणं सारखं माझ्या कानात घुमत होतं. मनात आले, अशा किती सखुबाईंची रोज फसगत होत असेल कोण जाणे! पण याला कारण अज्ञान, निरक्षरता. अंधार पडला की दिवा लावावा ही साधी गोष्ट निरक्षरांना कळते, पण ज्ञान म्हणजे प्रकाश आणि अज्ञान म्हणजे अंधार घालवण्यासाठी ज्ञानाचा दिवा लावला पाहिजे हे मात्र त्यांना समजत नाही.
त्यामुळे फसवणूक, अपमान, दारिद्र्य, दु:ख, उपासमार अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. साधा प्रवास करायचे म्हटले तरी यांना एस.टी. वरच्या पाट्या वाचता येत नाहीत. दुसऱ्याला विचारायला लागते, ही गाडी कुठे जाते ? काही वेळा विचारायचीच लाज वाटते. गाडीत बसतात. तिकीट काढतात आणि भलत्याच ठिकाणी पोहोचतात.
स्वत:ची सही करता येत नाही. न्याय म्हणजे काय? अन्याय कसा असतो? कायदा काय आहे ? इत्यादी. काही कळत नाही. म्हणून कोणीही यावे आणि पिळवणूक करावी. असे 'हीन जिणे' निरक्षरांच्या वाट्याला येते. खरंच, ज्ञान हा तिसरा डोळा आहे. एक वेळ नेहमीचे दोन डोळे नसले तर विशेष अडणार नाही.
पण ज्ञानाचा डोळा नसेल तर मात्र पदोपदी अडते. घरात आलेली पत्रे वाचता येत नाहीत. पत्राला उत्तर द्यायचे तर स्वत:ला लिहिता येत नाही. दुसऱ्याला वेळ असेल तेव्हा मिनतवारीने ही कामे करून घ्यावी लागतात. शिवाय घराच्या इभ्रतीसाठी खाजगी गोष्टीची वाच्यता होऊ नये म्हणून निरक्षरतेमुळे खबरदारी घेता येत नाही.
त्यामुळे खाजगी गोष्टींची मुखपत्राप्रमाणे आजूबाजूचे लोक चर्चा करतात. हे सर्व बदलायचे असेल तर साक्षरता वर्ग निरक्षरांच्या सोईंनी नीट चालवले पाहिजेत. काही दुपारी, काही रात्री. निरक्षरांच्या साक्षर होण्यातील अडचणी दूर करायला पाहिजेत. पालकांची उदासीन वृत्ती बदलायला हवी.
शाळेकडे मुले-मुली आले नाहीत तर शाळा त्यांच्याकडे गेली पाहिजे. आपल्याकडे बालकलाकार खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. तेव्हा काम करून त्यांचे शिक्षण कसे होईल. याचा विचार करून शाळा काढणे आवश्यक आहे. नियमित हजर राहणाऱ्या, चांगला अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना उत्तेजनार्थ काही बक्षिसे द्यावीत. सहली काढाव्यात.
वाचन, लेखनाच्या स्पर्धा ठेवाव्यात. त्यांचे लिहिता-वाचता येऊ लागल्यानतंरचे अनुभव मुलाखतींद्वारे निरक्षरांना ऐकवावेत. साक्षरतेची चळवळ उभी राहिली पाहिजे. यासाठी नोकरी क्लब, नोटरी न करणाऱ्या सुशिक्षित महिला, महिला मंडळे, सामाजिक संस्था यांनी सक्रीय सहभाग या चळवळीत घेतला पाहिजे.
शिक्षणामुळे आपल्या नेहमीच्या कितीतरी अडचणी दूर होतात याची जाणीव निरक्षरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण केली पाहिजे. तसेच एका साक्षराने एका निरक्षराला साक्षर करण्याचे व्रत अंगिकारायला हवे. पाणी ज्याप्रमाणे वाटेतील खड्डे भरते त्याप्रमाणे समाजातील सुशिक्षित लोकांनी निरक्षरतेचे न्यून भरून काढले पाहिजे.
तळागाळापर्यंत साक्षरता पोहचवली पाहिजे. म्हणजे साक्षर लोक आपली मते कोणालाही विकणार नाहीत. खऱ्या अर्थाने लोकशाही नांदेल आणि विद्येने मती आली मतीने नीती आली नीतीने गती आली एवढे सार्थ केले अवघ्या विद्येने! असा सुखद अनुभव सर्व भारतीयांना येईल.