सुगीचे दिवस मराठी निबंध | Sugiche Divas Aale Tar Essay Marathi

सुगीचे दिवस मराठी निबंध | Sugiche Divas Aale Tar Essay Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सुगीचे दिवस मराठी निबंध बघणार आहोत.  भारतासारख्या कृषिप्रधान देशातील सर्वात महत्त्वाचे उत्पादनसाधन शेती आहे; पण आज सर्वात नागवली जाते ती खेड्यातील जनता। 


'गुलाम खेड्यांचा स्वतंत्र देश' असे अजच्या भारताचे वर्णन केले तर वावगे ठरू नये. यात भर म्हणजे पावसाच्या लहरीपणामुळे रुजलेला 'देववाद' अधिकच बळकट होत आहे. शेतकरी आमचा 'प्राणदाता'! पण शहरी लोकांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नसते. बाराही महिने कष्ट करून कधीकधी त्याच्यावरच उपाशी राहण्याची पाळी येते.

'दाने भरता कन्सात येती हुशार पाखरं।

भर हंगामात अशी होते पारखी भाकर। 


तरीही तो निराश होत नाही. तो हरितक्रांतीचे स्वप्न पाहतो. उन्हाळ्यात जमिनीची मशागत करून 'मृग नक्षत्राची' तो आतुरतेने वाट पाहतो. एकदा पाऊस सुरू झाला की त्याचे डोळे आनंदाने नाचू लागतात. मग पेरणीची लगबग सुरू होते. भर पावसात

'राजा, परधान्या बैला चला रं।

मोत्याची जाळी धरू । 


अशी काहीबाही गाणी गात पेरणी सुरू होते. पेरणी झाली की हा बळीराजा जमिनीच्या निर्मितीची - सृजनशीलतेची कौतुकानं वाट पहात बसतो. शेतात हिरवे हिरवेगार इवले इवले अंकुर दिसू लागले की त्याच्या आनंदाला उधाण येते. तो भविष्यकाळातील हिरवे स्वप्न पाहू लागतो. 


शेतात पिकाला बहर आला की तो डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस त्या पिकाची राखण करतो. पावसाच्या लहरीपणाची त्याला सतत भीती वाटते. निसर्गाचा केव्हा कोप होईल आणि शेतातल्या पिकाची नासाडी होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच तो म्हणतो,

'पडतील स्वाती तर पिकतील मोती।'

'हत्ती पाडी भिंती।' 

'पडतील चित्रा तर अन्न नाही पितरा!'


तसे सुगीचे हंगाम दोन! एक 'खरीप' व दुसरा 'रब्बी'. भात व बाजरीची कापणी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होते. त्यावेळी बाजरीचा 'लिंबूर' युवावस्था. तरुणपणी अंगात गरम रक्त सळसळत असते. अंगात जोश, उत्साह, ताकद खूप असते. या सर्वांचा फायदा तरुण मुलामुलींनी करून घेतला पाहिजे. कारण हा काळ म्हणजे सुगी होय.


वेळेचा चांगला उपयोग युवकांनी करावा. खेळ खेळावेत, नदीत डंबावे, डोंगर चढावेत, वनात भटकावे, सहली काढाव्यात, निसर्गाचे पुस्तक वाचावे, मित्रसंग्रह करावा, छंद जोपासावेत. कारण या वयात तरुणांवर मोठी अशी कोणतीही जबाबदारी नसते. 


मुक्त स्वच्छंदी जीवन असते. विद्या, छंद व शरीरसंपदा कमावल्यास सुगीचे दिवस तर मजेत जातीलच, पण पुढील सर्व आयुष्य उत्तमप्रकारे आरोग्यदायी, यशस्वी जीवन जगतील. म्हातारपणीही मनाने तरुण राहू शकतील. असे तरुण, वृद्ध सर्वांनाच हवेसे वाटतील!


तरुणांनी सुटीत शिबिरांना जावे. चर्चासत्रांना जावे. वसंत व्याख्यानमालांना जावे. खूप ऐकावे, खूप पहावे. मनमोकळी चर्चा • करावी. बहुश्रुत व्हावे. माणसे पहावीत. त्यांच्या अंतरंगात शिरावे, हे शरीर जसे आपले आहे तसेच त्याचा उपयोग दुसऱ्यांसाठी होता होईल तो करायला शिकावे. तरच तारुण्यातील सुगीचे सार्थक ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद