युद्धात कामी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध | Yuddhat Kami Aalelya Sainikachya Patniche Manogat Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण युद्धात कामी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.
'दही घान हातावरती, रणा बाळ जाई।
चुडा तुझा सावित्रीचा, गडे सूनबाई॥'
असंच सासूबाईंच्या धीराच्या शब्दांनी मी त्यांच्या हातावर दही घातलं. दही नव्हे सौभाग्यच मी उतरवून दिलं... 'देव, देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती' हा सैनिकाचा बाणा, तर अहेवपणावर पाणी सोडण्याचा सैनिक पत्नीचा!... वैधव्य तिच्या डोक्यावर घिरट्या घालतं.
कधी माघारी फिरतं, कधी सौभाग्याचा घास घेतं. दु:खाच्या खाईत लोटणारी स्त्रीजीवनातील काळीकुट्ट घटना म्हणजे वैधव्य. माझ्या वाट्याला आलेल्या या अंधाराला एक रुपेरी कडा आहे. माझा चुडा रणमैदानावर शत्रूला खडे चारताना फुटला आहे. कुंकू बांगला युद्धात पुसलं आहे.
माण तालुक्यातल्या खेड्यातली मी माने कुळातली. आपेगावच्या जाधवांची सून! कॅप्टन विजयरावांची पत्नी. या सोयरिकीला घरचा विरोध पण मी आग्रही. मरण कुणाला चुकलंय? पण मग यायचंच तर मोठ्या कारणासाठी, मानाचं यावं. शेळी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा वाघ होऊन दहा वर्षं जगावं...
जाधवांच्या कुटुंबाची परंपरा अशीच वाघाची! सासरे आझाद हिंद सेनेत; बर्मा वॉरमध्ये गेले. माझे थोरले दीर ६५च्या! मधले दीर शेती बघतात. धाकटे विजयराव....! माझ्या सासूबाई धीराच्या. वीरपत्नी, वीरमाता. पती व थोरला मुलगा युद्धात जाऊनही विजयरावांना लष्करात जायला परवानगी दिली. वीरांनीच कराव्या धीराच्या गोष्टी.
'जय जवान, जय किसान' घोषणेला शोभणारं माझं सासर. सैनिकांचं जीवन स्वत:हून पत्करणारं आमचं शेतकऱ्याचं घराणं.शेती पिकवणारं आणि स्वातंत्र्याची फळं राखणारं. मी नववी पास. विजयरावांचा मराठा बटालियनमध्ये कॅप्टनचा हुद्दा होता. उणीपुरी तीन वर्षही माझ्या ते वाट्याला आले नाहीत.
पूच, लडाख, डेहराडूनवरून येणारी पत्रंच काय ती सोबत करायची. त्या पत्रातही घरच्या गोष्टींपेक्षा 'इंच इंच लढवू' हाच सूर असायचा. माझा ऊर भरून यायचा... महिनाभराची मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद