गाय निबंध 10 ओळी | 10 Lines On Cow in Marathi

 गाय निबंध 10 ओळी | 10 Lines On Cow in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गाय मराठी निबंध बघणार आहोत.  गाय हा एक पाळीव प्राणी आहे. गाईचा रंग पांढरा, तांबुस किंवा काळा असतो. गाईला चार पाय, दोन शिंगे, दोन कान, दोन डोळे व एक गोंडेदार शेपूट असते. 


गाय स्वभावाने अतिशय गरीब प्राणी आहे. गाई पासून आपल्याला दुध मिळते. लहान मुलांना हे । दूध विशेष पौष्टीक व औषधीयुक्त असते. दूधापसून दही, . ताक, लोणी, तूप तयार करतात. गाय गवत व झाडपाला खाते. 


गाईला पेंड खायला घालतात. चरण्यासाठी रानात नेतात. घरी गाईंना गोठ्यात बांधुन ठेवतात. काही लोक गाईची पूजा करतात. गाईच्या ओरडण्याला हंबरणे असे म्हणतात. 


गुराखी गाईंना चरायला रानात नेतात. हिंदू लोक गाईला पवित्र मानतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद