माझा वर्ग निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines On My Classroom in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा वर्ग मराठी निबंध बघणार आहोत. आमचा वर्ग ५ वा 'अ' आहे . शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर हा वर्ग आहे. वर्गाला दोन खिडक्या आहेत. त्यातून भरपूर प्रकाश व हवा येते.
वर्गात बसायला बाके आहेत. शिक्षकांसाठी टेबल खूर्ची आहे. बाजुला छोटीशी आलमारी आहे.त्यात नियमित लागणारी शिक्षकांची पुस्तके, तपासायच्या वह्या व इतर साहित्य ठेवलेले असते.
भिंतीवर नकाशे व सुविचारांच्या पाट्या लावलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एका बाजूला वर्गाचे वेळापत्रक व सरस्वतीचा फोटो आहे.
फोटोला आम्ही नियमित हार घालतो. आमचा वर्ग आम्ही नेहमी स्वच्छ ठेवतो. शाळेची स्वच्छता शिपाई करतात.
राष्ट्रीय सणाच्या दिवशी आम्ही आमचा वर्ग सजवतो. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद