माझी शाळा निबंध 10 ओळी | 10 Lines On My School in Marathi

 माझी शाळा निबंध 10 ओळी | 10 Lines On My School in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी शाळा मराठी निबंध बघणार आहोत.  माझ्या शाळेचे नाव आदर्श ज्ञान मंदीर आहे. शाळेची इमारत लहान परंतु अतिशय हवेशीर व मोकळी आहे. शाळेत एक हॉल आहे. 


त्यात सर्व सांस्कृतिक समारंभ होतात. शाळेला लागून छोटसं पटांगण आहे. तेथे आमची दर शनिवारी कवायत होते.


आमचे शिक्षक व मुख्याध्यापक स्वभावाने खूप छान आहेत. शिस्त, पध्दतशीरपणा, देशप्रेम हे गुण आम्ही त्यांच्याकडूनच शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. 


माझ्या शाळेचा मला अभिमान वाटतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद