दामू दंडवते मराठी निबंध | DAMU DNEDAVATE ESSAY MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दामू दंडवते मराठी निबंध बघणार आहोत. माणसाच्या रंगरूपाचा-चेहऱ्याचा आणि स्वभावाचा काही संबंध असतो असे तुम्हांला वाटते का ? मग गोगलगाय दिसणाऱ्या बावळट चेहऱ्याच्या दामूचा हा फोटो पहा पेपरमधला !
नाव दामोदर दयानंद दंडवते. वय छत्तीस, शिक्षण नववी नापास, उंची साडेपाच फूट, केस , पिंगट व कुरळे, रंगाने गोरटेला, नाकाचा वासा. मध्यम अंगकाठी, डोळे बारीक व खोल गेलेले. ओठ संत्र्याच्या फोडीसारखे. वरच्या दातांची ठेवण पुढेच. बोलणे एवढे भराभर की शब्द गुंतायचे. अंगावर पोशारव काय विचाराल, तर चुरगळलेला लेंगा व पिरगळलेला पांढरा शर्ट.
असा हा बावळटखान-पक्का बदमाश. माधव काझीचा दुसरा अवतार असे सांगितले तर ते तुम्हांला खरे वाटेल का ? मग त्या पेपरमधल्या फोटोखालची बातमी वाचा-“दामू दंडवते यास अटक. लग्न करतो असे सांगून एका मुलीला फसवले आणि तिच्या बापावर याने विषप्रयोग केला. आणखीही अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे !" यावर काही म्हणायचंय ?
शाळेत असल्यापासून मी त्याला ओळखतो. तेव्हासुद्धा याने दोन तीन वेळा पुस्तके चोरण्याचे प्रकार केले. त्याचे वडील लहानपणी वारले. मग आईला हा वारंवार फसवी. पुढे त्याची आई ठाण्याला एका डॉक्टरांकडे कामाला असताना, त्या डॉक्टरांच्या शब्दाखातर दामूला कारखान्यात नोकरी मिळाली.
चार सहा महिने ठीक गेले. एक दिवस दामूच्या हातापायांत बेड्या पडल्या. कारखान्याच्या मालकांची हुबेहूब सही करून दामूने चार हजार रुपयाचा चेक वटवला होता. डॉक्टरांनी चार हजारांचा जामीन भरून त्याला सोडवला. दुसऱ्या दिवशी सकाळीच डॉक्टरांच्याच दवाखान्यातले पाऊणशे रुपये घेऊन दामू फरारी झाला.
त्यानंतर सहा सात वर्षानी एक दिवस दामू अचानक मुंबईला ताईंच्या खोलीवर आला. डेअरीत नवे मशीन बसविण्याचे काम त्याला करायचे होते. तो डेअरी मॅनेजर झाला होता. खिशात पैसा खुळखुळत होता. त्याचे लग्न ठरले होते. खिशात मुलीचा फोटो होता. त्याने सर्वांना पेढे दिले. सिनेमा दाखवला. “दामू तू एवढा सुधारशील असं वाटलं नव्हतं हो"
असं ताई म्हणाल्या. आणि अशा प्रेमळ ताईचं पोस्टाचं पासबुक मारायच्या प्रयत्नात दामू फसला. तेव्हाच त्याला सारेजण मारायला टपले होते पण ताईंच्यामुळे तो वाचला. - काही दिवसांनी खरी हकीगत कळली की तो कुठेही नोकरीला नव्हता, त्याचं लग्नही ठरलं नव्हतं. कुठेतरी मोठा डल्ला मारून तो मुंबईला आला होता.
गोरेगावचे आमचे हेडमास्तरच ते सांगत होते. त्यांच्या पंढपूरच्या बहिणीने झोपाळा मागितला आहे असे सांगून, खुणा व ओळखी पटवून त्याने झोपाळाच लांबवला होता. पंढरपूरला त्याने कहर केला. प्रीमियर ऑटोमोबाईलच्या मॅनेजरचा सेक्रेटरी म्हणून तीन चार दिवस तिथे राहिला.
तिथून रोज गाडीसाठी तारा करायचा. त्याची त्याला तारेने उत्तरंही यायची. पंढरपूरच्या विठोबावर महाएकादशणी करून १०८ ब्राह्मणांना त्याने जेवण देण्याची तयारी केली मास्तरांच्या बहिणीच्या नावेच दुकानातून सामान उसने मागविले.
ब्राह्मणांना पाच पाच बंदे रुपये दक्षिणा द्यायची म्हणून गावतल्या लोकांकडून मास्तरांच्या बहिणीच्या नाव सुट रुपये गोळा केले...ब्राह्मणांना पानावर जेवायला बसवले...आणि 'आमचे मॅनेजर आले, त्याना घेऊन येतो' असे सांगून चारशे रुपये घेऊन जो पसार झाला तो कायमचा, मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद