एकीचे बळ निबंध मराठी | Ekiche Bal Essay in Marathi

 एकीचे बळ निबंध मराठी | Ekiche Bal Essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकीचे बळ मराठी निबंध बघणार आहोत. एका रानात एका मोठ्या झाडावर बरेच पक्षी रहात होते. त्या पक्षांमधे एक मोठा पक्षी होता. त्याचे सर्वजण ऐकत असत.


एक दिवस पक्षी आकाशात उडत होते. त्यांना खाली धान्य पसरलेले दिसले. जवळच धान्याचे राखण करणारा देखील नव्हता. सर्व पक्षी भराभरा खाली उतरले व ते धान्याचे दाणे खाऊ लागले.


धान्याच्या खाली पारध्याने जाळे टाकले होते. जाळ्यात सर्व पक्षांचे पाय अडकले कोणालाच उडता येईना. सर्व पक्षी घाबरले. त्यात जो मोठा पक्षी होता तो म्हणाला, “घाबरू नका.. मी म्हणतो तसे करा. 


मी एक दोन तीन म्हणताच सर्वांनी एकदम उडायचे." मोठ्या पक्षाने तीन म्हणताच जाळे घेऊन सर्व पक्षी उडाले व उडत उडत आपल्या घरट्याजवळ आले. खाली उतरून त्यांनी जाळयातून आपली सुटका करून घेतली.


त्याकरिता त्यांनी एका उंदराची मदत घेतली. एकीचे बळ फार मोठे असते.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 2

एकीचे बळ निबंध मराठी | Ekiche Bal Essay in Marathi



वर्तमानपत्र चाळता-चाळता समोर लक्ष गेलं... पाच-सहा काळ्या मुंग्या...एका मोठ्या झुरळाला ओढून त्यांच्या इच्छित ठिकाणी न्यायच्या प्रयत्नात होत्या. मनात आलं, ह्या मुंग्यांचा जीव तो केवढा नी...त्यांच्या पुढे ते अवघड काम सहजसाध्य आहे. सहकारात संघशक्ती आहे. म्हटलेच आहे  “संहतिः कार्यसाधिका!"


खरोखर सहकाराविना तरणोपाय नाही! निसर्गातील प्राणिमात्र आपल्याला अनेकवेळा हा धडा घालून देतात. पोळ्यापाशी मध घेऊन येताना मधमाश्या कधी पाहिल्यात? राणीमाशी, कामकरी माशी...सर्वच जण किती बिनबोभाट काम पार पाडत असतात.


लहानपणापासूनच आपणा सर्वांना इसापच्या, पंचतंत्रातल्या गोष्टी तर माहीत आहेतच. पारध्याच्या जाळीतून निसटण्याची पक्ष्याची किमया, कबुतराने टाकलेल्या वाळलेल्या पानाने वाचलेली पाण्यातली मुंगी, विभाजनामुळे सिंहाकडून आत्मघात ओढवून घेणारे बैल...ह्या सर्वांतून तात्पर्य काय तर...सहकार व एकी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू! सहकारातूनच एकी साधता येते व एकी असेल तरच सहकार्याची भावना दृढ होते.


माणूस तर पहिल्यापासूनच जमावाने राहणारा समाजप्रिय घटक. मग तो अश्मयुगातील शिकार करणारा असो वा २१ व्या शतकातील संगणक युगातील असो. त्याची उन्नती व सुखसमृद्धी हे सहकाराचेच फलित आहे. एकीच्या बळावर अशक्य कोटीतील गोष्ट नुसतीच शक्य होते असं नाही तर ती सुकर व सुलभही होते. 



एकटा मनुष्य एकट्याच्या मर्यादित शक्तीने, साधनसामुग्रीने सर्वांगीण विकास करून घेऊ शकत नाही, हे सत्य आहे. म्हणतात ना 'गाव करील ते राव काय करील!' शरीरातील इंद्रियांबद्दल बोलायचे तर एकी हाच त्यांच्या कामाचा पाया आहे. शरीरात एका इंद्रियाच्या असहकाराने मोठा हाहाकार माजू शकतो.


सहकारी चळवळीमुळे श्रमांची विभागणी होते व सामाईक सत्ता निर्माण होते. रशियात सामुदायिक व सामाईक पद्धतीवर शेतीसुद्धा केली जाते. कोल्हापूर संस्थानाचे अधिपती राजर्षी शाहू महाराजांनी तर पूर्वीच, सहकारी तत्त्वाचा वापर शेती व उद्योगात करून आर्थिक विकास घडवून देण्यासाठी गरीब शेतकऱ्यांनी एकमेकांना मदत केली व पैसा गोळा केला; तरच शेतकरी कर्जमुक्त होणे शक्य आहे. 


हा विचार बिंबवन जागती निर्माण केली. अशा त-हेने प्रवरानगर येथे सहकारी क्षेत्रातील देशातला पहिला साखर कारखाना उभा राहिला. त्यांच्या अनुषंगाने प्रवरानगरला मेडिकल कॉलेज, इस्पितळे, दूध-वितरण संस्था, सहकारी बँका, पतपेढ्या, पोल्ट्या सुरू आहेत. 


हल्ली मोठमोठ्या हॉस्पिटलांमध्ये अत्याधुनिक उपकरणे, 'सर्जिकल' साधनसामुग्री डॉक्टर सहकारी तत्त्वावर विकत घेतात, त्यामुळे न्यूरोसर्जरी, आयसर्जरी आपल्या देशात सर्रास सुरू झाली. अन्यथा एकटा शल्यविशारद डॉक्टर अर्थसहाय्याअभावी ही उपकरणे कशी घेऊ शकेल?


United we stand, divided we fall हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. सहकाराचे एकीचे हात एकत्र आले की, प्रचंड शक्ती जमा होते. मग धनाचीही उणीव भासत नाही आणि सर्वांनी मिळून दगड आणले तर लंकेपर्यंतचा सेतूही वानर बांधू शकतात. 



आपण तर माणसे! 'लगान' सिनेमातही दाखवण्यात आलं होतं, की ‘एक उठी तो ऊंगली उठी, पाँचो मिली तो बन गयी मुठ्ठी.' सिनेमात भुवनला एकट्याला ब्रिटिशांशी लढताना किती सायास पडत होते पण एकी झाल्यावर त्यांनी गावातून ब्रिटिशांना हाकलले. शेतसारा माफ झाला. म्हणतात ना, साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा। मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढाना।



समान व्यावसायिकांची एकी वा संघटना असेल तर त्यांच्या मागणी, हक्कांना आवाज राहतो डॉक्टर्स एकत्र आले, तर आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया अशी विधायक कामे समाजात होतात. 'एकजूट ही आदर्श आमची उत्कृष्टाप्रत जाण्यासाठी' हे ब्रीदवाक्य ठरवून एकीतच राहणं नक्कीच फायद्याचं. या एकीतूनच जन्माला येते - राष्ट्रीय 


एकात्मता. सहकार चळवळीतून ग्रामीण विकास, ग्रामीण रोजगार योजना अस्तित्वात आल्या. शहरातील निवासाची समस्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निर्मिती होऊन सोडविली गेली. राष्ट्राराष्ट्रातही अर्थसहाय्य, तंत्रज्ञान, यंत्रसामग्री याबाबतीत सहकार्य केले जाते.


भारतातील भिलाईचा पोलाद कारखाना रशियन तंत्रज्ञांच्या सहकार्याने उभारला गेला. राकेश शर्मा हा आपला अंतराळवीर रशियाच्या सहकार्यामुळेच अवकाशात भ्रमण करून आला. अशा प्रकारे हीरो होंडा ह्यांची एकी= हीरोहोंडा- रस्त्यांवरून पळते. 

एकमेकां साह्य करू । 

अवघे धरू सुपंथ ।।' 


हाच एक वैश्विक सुखाचा आणि विकासाचा मूलमंत्र आहे. ...जर साथ मिळाली सहकाराची तर गुंफण सजते हातांची मैत्री जडते मनामनांची सुफळ सांगता कार्यसिद्धीची! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद