सर्कस वर मराठी निबंध Essay On Circus In Marathi

 सर्कस वर मराठी निबंध Essay On Circus In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सर्कस मराठी निबंध बघणार आहोत. सर्कस हे मनोरंजनाचे खूपच चांगले साधन आहे. ती पाहिल्यामुळे ज्ञान मिळते व करमणकही होते. आमच्या गावात मागील वर्षी 'ग्रेट इंडिया सर्कस' आली होती. 


त्यावेळी मला मोठ्या भावाबरोबर सर्कसला जाण्याची संधी मिळाली. आम्ही आधीच तिकिटे काढून ठेवली होती. रविवारचा दिवस होता. आम्ही वेळेपूर्वीच तिथे पोहोचलो. सर्कसचा तंबू खूपच मोठा होता. त्याशिवाय इतर बरेच लहान मोठे तंबू होते. मुख्य प्रवेशद्वारावर फार गडबड होती. 


मोठमोठे पोस्टर्स बाहेर लावलेले होते. त्यात सर्कसमधील विविध दृश्ये चित्रित केलेली होती. रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांच्या माळा लावलेल्या होत्या. त्यामुळे सगळीकडे झगमग प्रकाश पसरला होता. लाऊडस्पीकरवर गीते लावली होती. 


आम्ही आत गेल्यावर पाहिले की तिथे खूप गर्दी होती. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलऱ्या केलेल्या होत्या. तसेच खा पण होत्या. आम्ही सर्व जण समोरच्या खुर्त्यांवर बसलो. लवकरच सर्कस सुरू झाली आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन सर्कस पाहू लागले. सर्वात आधी दोन जोकर आले. 


एक जोकर खूप उंच होता आणि दुसरा बुटका. दोघांनी आपल्या मस्कऱ्यांनी, विनोदांनी लोकांना हसविले. त्यानंतर हत्ती, अस्वल, घोडे वगैरे जनावरांनी कसरती करून दाखविल्या. प्रत्येक कसरतीनंतर प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देत होते. 


झोक्यावरील कसरतपटू मुले-मुली आपले प्राण धोक्यात घालून आश्चर्यकारक कसरती करून दाखवीत होते. एका माणसाने चार मोठे चेंडू एकदम वर फेकून व एकही चेंडू खाली न पाडता अनेक कसरती केल्या. अशाच प्रकारचे आणखी काही कार्यक्रम होते.


कित्येक मुलींनी एकमेकीवर उभे राहून एक खूप उंच पिरॅमिड बनविले. मग सायकलीवरच्या कसरती करून दाखविल्या. एक चाकी सायकलवर केलेल्या कसरती मनोरंजक होत्या. वाघांचा कार्यक्रम तर अद्भुतच होता. रिंगमास्तरने सात वाघांबरोबर कसरत करून दाखविली.


त्यांना रिंगणाला फेरी मारावयास लावली, स्टुलावर उभे केले, फळीवर चालावयास लावले. मला तर त्यावेळी भीती वाटली. रिंग मास्तरने वाघाबरोबर कुस्ती केली. ती पाहून मजा वाटली. मध्येच रिंग मास्तर वाघाजवळ जाऊन त्याला कुरवाळायचा. कितीदा तरी मनात विचार आला रिंग मास्तरने या रानटी जनावरांना प्रशिक्षण कसे दिले असेल?

 

कोणते उपाय योजले असतील? ते क्रूर असतील का?टी. व्ही. चित्रपट या प्रसार माध्यमांनी सर्कसची लोकप्रियता कमी केली आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. लोकांची वन्यपशुंबद्दलची जागरूकता वाढली आहे. या लोकांना जनावरांचे शोषण करणे पसंत नाही. फक्त माणसांचीच सर्कस असेल तर किती छान होईल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद