पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध | pustakachi atmakatha in nibandh marathi.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पुस्तकाची आत्मकथा मराठी निबंध बघणार आहोत. ऐक माझी कहाणी. तुझी कथा ती माझी व्यथा, आणि तुझ्याबद्दलची गा-हाणी हीच माझी कहाणी. 'हासत कर्म करावे भोगावे रडत तेचि परिणामी !'
आता रडून, काय उपयोग? पहिल्या चाचणी परीक्षेत इंग्रजी व गणित या विषयात तू नापास झालास तेव्हा जर असा रडला असतास तर? पण त्यावेळी तू गयावया करून आईची सही घेतलीस आणि वडील बाहेरगावी गेले आहेत अशी थाप शाळेत मारलीस.
आता पहिल्या सत्रपरीक्षेचे पान काढ. वाच ते पार्क. इंग्रजीत ३९, बीजगणितात, ३० तर भूगोलात १७! हे खरे मार्क आहेत का ? इंग्रतीत ९ च्या मागे ३, बीजगणितात ३ वर ० तर भूगोलात ७ च्या मागे १ टाकून मार्काची फिरवाफिरव कोणी केली ? अरे केवढी ही फसवणूक ?
बरं ! आता हजेरीचे पान उलटा महाराज ! जून ते सप्टेम्बर ठीक पण ऑक्टोबर ते मार्चपर्यन्तचे महिने पहा. प्रत्येक महिन्यात चार सहा दिवस गैरहजर, सरांनी वडिलांच्या चिठ्या मागितल्यावर तू सरळ स्वतः वडिलांची सही ठोकून चिठी नेऊन द्यायचास, हे मी पाहिले नाही का ? एवढे दिवस गैरहजर !
वा; घरच्या लोकांना फसवून कुठे जात होतास? एवढंच कशाला? शाळेत हजर होतास तेव्हा तरी रोज सबंध वेळ शाळेत होतास असं थोडंच आहे ? टोळभैरवांच्या नादी लागून कधी चार तासानंतर तरं कधी कधी आधीच वर्गातून पळून जात होतास. पळून जाण्याचं कारण काय ? तर म्हणे वर्गात शिकवलेले समजत नाही ! मग त्यावर पळून जाणं हा उपाय कोणत्या दीडशहाण्याने सांगितला तुला ?
वर्गातून बाहेर पडल्यावर तुमचं टोळकं जायचं एखाद्या उडुपी हॉटेलात, नाही तर एखाद्या हिंदी पिक्चरला. आठवड्याला २-३ तरी सिनेमे झाले असतील ना ! अरे तुझा सिनेमा झाला, तुझ्या अभ्यासाचं नाटक झालं पण माझा मात्र तमाशा झाला!
माझ्या अंगावर जागोजाग लाल खुणा ! रक्ताने भरलेल्या जखमी जवानासारखी माझी स्थिती झाली, तरी तुला माझी दया आली नाही ? एक विचारू ? जरा खाजगी प्रश्न आहे हं ! हे एवढे चित्रपट पाहायला पैसे कुठून ९ आणलेस? मला वाटते पैशाबद्दल तुला वडिलांना टोपी घालता येणं शक्य नव्हते. मग आहेच आई पैसे द्यायला ! ती नाही, तेव्हा वापरले फीचे पैसे!
A stich in time, saves nine. योग्य वेळी तुझ्याकडे लक्ष दिले असते तर पण तुझ्या आई-वडिलांना दोष देण्यात अर्थ नाही. सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत ते कामावर असतात. तुझ्याकडे लक्ष देण्याइतका वेळ व स्वास्थ्य कुठे आहे त्यांना । उद्या निकालाचा दिवस आहे. उठा राव बोलल्याचा राग मानू नको, पुन्हा असा पश्चात्ताप करण्याची वेळ आणू नकोस ! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद