रुपयाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Rupyache Atmavrutta Nibandh Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण रुपयाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. शंकरने दिवाणावरच्या थैलीतले रुपये मोजले ते झाले ९९ ! “आणखी एक रुपया हवा. तो कोण देईल?" दुसऱ्याने देण्याची वाट काय पाहतोस ? स्वतः कष्ट करून कमाव की !” समोरच्या रुपयांच्या ढिगातून आवाज आला. शंकर डोळे विस्फारून पाहू लागला आणि कान टवकारून ऐकू लागला.
त्या ढिगातला पुढे आलेला रुपया बोलत होता. “शंकर अजून तुला माझी ओळख पटली नाही. अरे, मी रुपया बोलतोय, तुझ्या समोर पडलेल्या ढिगाऱ्यातला ! या सृष्टीवर माझा अवतार झाल्यापासून व्यवहाराचे सारे स्वरूपच पालटून गेलंय. तसं आमचं घराणं फार जुनं. कुणा शेरशहाने म्हणे आमचं नाणं सुरू केलं. मुसलमानी अंमलानंतर ब्रिटिश अंमल आला आणि त्यांनी आम्हांला थोडं उजळ नवं रूप दिलं.
राणी छाप, राजा छाप असे आमचे अनेक अवतार झाले. अरे मुंबईची सरकारी टाकसाळ माहीत आहे ना ? तेच आमचं प्रसूतिगृह बरं! तशी माझी लहान नागडंदेखील इथलीच. आठ आणे, चार आणे, दोन आणे, एक आणा, आणि आता वीस पैसे, दहा पैसे...पैसा गेला बरं का आता. त्याचीही नाना रूपं झाली. भोकाचा पैसा आला होता...पण तोही गेला सरकारच्या तिजोरीला भोक पाडून !
“एकूण व्यवहारी जगात माझे महत्त्व माइया इतर भावंडांपेक्षा जास्त आहे. दरवर्षी भारताचे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा ते माझ्या मूल्याबद्दल विवरण करतात. सरकारी तिजोरीत मी (रुपया) कसा येणार, मी खर कसा होणार याचा खुलासा ते करतात. माझे वास्तविक मूल्य किती ते सांगतात म्हणजे माझं किती अवमूल्यन झालं ते सांगतात.
तू बुचकळ्यात पडलेला दिसतोस शंकर. रुपयाचं अवमूल्यन हे काय प्रकरण, असाच तुझा प्रश्न ना ? अरे तू पेपर वाच. तुला कळेल माझी किंमत सोळा (१६) पैसे झालीय म्हणे. याचा तरी अर्थ कळला का तुला ? सोप्या शब्दांत सांगू ? पूर्वी ज्या वस्तूला १६ पैसे पडत होते त्याला आता रुपया पडतो.
किंवा एक अमेरिकन डॉलरची किंमत पूर्वी जर आठ रुपये असली तर ती आता ४० ते ५० रु. झाली. फार महागाई झालीय. खेड्यातील बायका काय म्हणतात माहीत आहे ? पूर्वी रुपयाला खूप किंमत होती. एक रुपयात बऱ्याच वस्तू येत असत. आता वस्तूला किंमत आहे रुपयाला नाही. कारण एका वस्तूला आता खूप रुपये पडतात.
माझं बाह्य रूप चंद्रासारखं गोलाकार आहे. पूर्वी माझ्या अंगात अस्सल व निव्वळ चांदी होती. आता त्यात चांदीबरोबर जस्त-तांबे आणखी बरंच काही आहे. पण माझ्या बाह्य रूपावर जाऊ नको. तसं नाशिकच्या छापखान्यातून कागदी नोटेच्या रूपात माझा अवतार होत असतो. बाह्य रूपरंगाकडे बघण्यात वेळ घालवू नको...माझं आंतरिक सामर्थ्य पहा.
'फिरते रुपयाभवती दुनिया' अस एका कवीनं म्हटलं आहे माझ्याबद्दल. अगदी खरं आहे ते ! सारं जग माइयाभोवती फिरतंय, धावतंय, पळतंय, माझ्या प्राप्तीचा हव्यास एवढा वाढलाय की त्यामुळे प्रेम, आपुलकी, त्याग या गोष्टी तर क्षीण आणि निःसत्त्व झाल्या आहेतच मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद
पण जगात सर्वत्र भ्रष्टाचार, लबाडी, विश्वासघात, घातपात, अफरातफर या गोष्टी डोंगरातल्या झाडीसारख्या फोफावल्या आहेत. मुलगा बापाविरूद्ध उठतो, नवरा बायकोच्या माहेरच्या संपत्तीवर डोळा ठेवतो असे प्रकार सर्रास घडतायत. त्यातून प्रचंड गुन्हेगारी वाढत्येय.
माझं काळं रूप काळा पैसा म्हणून ओळखलं जातं. असं म्हणतात सध्या भारतात पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त काळा पैसा वावरतोय. लपून छपून, तोंड काळं करून. आणि या देशातले कित्येक व्यवहार पालटविण्याची किंवा उलथविण्याची शक्ती त्या काळ्या पैशात आहे.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. माहीत आहे ना ? एक छाप ! दुसरा काटा ! तशी माझ्या व्यवहाराला, रूपाला व सामर्थ्याला देखील दुसरी बाजू आहे. स्वच्छ, पांढरी, रास्त व सचोटीच्या व्यवहाराची. शंतनुराव किर्लोस्कर नेहमी म्हणत-“पैसा केवळ वाईट मागनिच मिळतो असे नाही.
प्रामाणिकपणे, चातुर्याने व योग्य प्रकारच्या धाडसाने देखील पैसा मिळविता येतो." शंकर भानावर आला तेव्हा रुपया बोलायचा थांबला होता. त्याने कपाटातून एक रुपया आणला; आणि तो त्या ढिगात टाकला.