महात्मा गांधी मराठी निबंध – 10 ओळी | 10 Lines Essay On Mahatma Gandhi In Marathi |.

महात्मा गांधी मराठी निबंध – 10 ओळी | 10 Lines Essay On Mahatma Gandhi In Marathi |.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा गांधी  मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण महात्मा गांधी  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  साऱ्या भारताचे बापूजी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम महात्मा गांधींनी केले. 


गाधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे झाला . त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. ते आईवडिलांची आज्ञा पाळीत. सत्य व अहिंसा हे गुण लहानपणापासून त्यांच्या अंगी होते.


वकिलीची परीक्षा पास होऊन १८९१ साली ते मायभूमीस परत आले. महात्माजींनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. त्यात त्यांना तुरूंगात जावे लागले. त्यांनी इंग्रजांना 'हिंदुस्तान सोडून जा' असे बजावले. 


अहिंसेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्य - अहिंसा - प्रेम यांची शिकवण साऱ्या जगाला दिली.


खरे बोला, भिऊ नका, कुणाची हिंसा करू नका, हिंदू, मुसलमान, शीख, बौध्द, खिश्चन हे सारे भाऊ आहेत असे गांधीजी म्हणत असत. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. अस्पृश्यांच्या उध्दारासाठी ते झटले. 


त्यांनी आपले जीवन देशसेवेत घालवले म्हणूनच लोकांनीच त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 

महात्मा गांधी मराठी निबंध – 10 ओळी | 10 Lines Essay On Mahatma Gandhi In Marathi |.

असहकार हे तत्व वापरुन इंग्रज सरकारला सळो की पळो . करुन सोडणारे थोर नेते म्हणजे महात्मा गांधी होत. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी झाला.


परदेशामध्ये जाऊन त्यांनी वकीलीचे शिक्षण घेतले.. भारतातील लोकांवर होणारा ब्रिटिशांचा अन्याय पाहून त्यांना अतिशय चीड आली. व म्हणून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. मिठासारख्या साध्या गोष्टीवरही इंग्रज सरकार जुलमी कर बसवत असे. 


म्हणूनच गांधीजीनी मिठाचा सत्याग्रह सुरु केला. यालाच दांडीयात्रा असे म्हणतात. हजारो-लाखो लोक या दांडीयात्रेत सहभागी झाले होते.


१९४२ साली गांधीजींनी चले-जाव ही चळवळ सुरु केली. ब्रिटिश सरकारला चले-जाव, छोडोभारत' असेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. भारतातील बहुतांश लोक गरीबीमुळे अर्धवस्त्र रहात होते. 


म्हणून गांधीजीना अतिशय वाईट वाटले. मग त्यांनीही फक्त पंचा नेसायला सुरुवात केली. अशा या थोर नेत्याला लोकांनी महात्मा' ही पदवी दिली. सर्व जग त्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.