संत नामदेव मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines on Sant Namdev in Hindi

 संत नामदेव मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on 10 Lines on Sant Namdev in Hindi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संत नामदेव मराठी निबंध बघणार आहोत. नामदेवांचा जन्म कार्तिकी एकादशीच्या दिवशी झाला. लहानपणापासून नामदेवाला पांडुरंगाच्या भक्तीची ओढ होती.


एके दिवशी काही कामानिमित्त्य त्यांचे वडील बाहेरगावी गेले. विठ्ठलाला नैवेद्य नेण्याचे काम नामदेवावर आले. नामदेवाने नैवेद्य घेण्यासाठी देवाजवळ खूपच हट्ट धरला. दगडाचा देव नैवेद्य कसा काय खाणार? 


नामदेव देवाला म्हणाला 'बघ हं - देवा, आता जर का तू जेवला नाहीस तर मी माझे डोके तुझ्या पायावर आपटीन. तो तसं करणार इतक्यात स्वतः पांडूरंग तेथे अवतरले व नामदेवासाठी जेवले.


घरी गेल्यावर ही गोष्ट त्याने आईवडिलांना सांगितली तेव्हा त्यांना खरे वाटेना. दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन देवळात आला आणि म्हणाला “देवा, आपण काल खरंच जेवलात ना? हे खरे आहे हे दाखविण्यासाठी आज पुन्हा जेवा”. 


भक्ताची लाज राखण्यासाठी देव पुन्हा जेवले. धन्य तो " नामदेव आणि धन्य त्याची भक्ती.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद