बैल पोळा निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on bail pola nibandh in marathi -

 बैल पोळा निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on bail pola nibandh in marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  बैल पोळा मराठी निबंध बघणार आहोत.  पोळा हा बैलांचा सन्मान करण्याचा सण आहे. बैल शेत नांगरतात, मोट चालवतात, गाडी ओढतात म्हणून बैलांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. या दिवशी बैलाला पाहुण्यांचा मान देतात. 


पोळा हा आपल्या भारतातील शेतकऱ्यांचा फार मोठा सण आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना धुवून स्वच्छ करतात. बैलांच्या शिंगाना रंग देतात. त्यांना घरी केलेले गोड पदार्थ खायला घालतात.


संध्याकाळी सर्व शेतकरी आपले सजवलेले बैल घेऊन । पोळ्यात जातात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतात. पोळा फुटल्यावर बैलांना घरी आणून त्यांची पूजा करतात. त्यांना पुरणपोळीचे जेवण देतात.


शेतीवर सर्व लोकांचे जीवन अवलंबून असते. शेतीच्या कामात बैलाचा खूप उपयोग होतो. त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून शेतकरी पोळा हा सण अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करतात.


आपणास उपयोगी पडणाऱ्या बैलासारख्या प्राण्यावरही प्रेम करावे. त्यांच्याविषयी आदर बाळगावा हे पोळा ह्या सणामुळे सर्वांना कळते . मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद