दिवाळी निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Diwali in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दिवाळी मराठी निबंध बघणार आहोत. दिवाळी हा हिंदू लोकांचा सर्वात आनंदाचा आणि महत्त्वाचा सण आहे. हा पाच दिवसांचा सण लोक दिवे लावून साजरा करतात. धनत्रयोदशी हा दिवळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात.
नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे उठून अंगाला तेल, उटणे लावून आंघोळ करतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाला ठार मारले होते. लक्ष्मीपूजन हा दिवळीतील महत्त्वाचा दिवस.
ह्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करतात. गोड पदार्थ खातात. या दिवसापासून व्यापारी लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. बलीप्रतिपदा या दिवशी गाईम्हशींची पूजा करतात. त्यांना सजवतात.
या दिवशी देवाने दुष्ट बळी राजाला पाताळात पाठविले होते. भाऊबीज हा बहीण भावाचा खूप आनंदाचा दिवस असतो. या दिवशी बहिण भावाला ओवाळते तर भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.
दिवाळीच्या पाच दिवस घरी विविध गोड पदार्थ करतात. लहान मुले फटाके उडवितात. शाळेलाही सुटी असते. असा हा आनंदाचा सण मुलांना खूप आवडतो. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद