वाढदिवस मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Essay on Birthday in Marathi

 वाढदिवस मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Essay on Birthday in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाढदिवस मराठी निबंध बघणार आहोत.  वाढदिवस हा जन्मदिवशी साजरा करतात. एक एक दिवसानी वयात वाढ होते म्हणून याला वाढदिवस म्हणतात.


घरोघरी असे वाढदिवस साजरे करण्यात येतात. ज्याचा वाढदिवस असेल त्याला नवीन कपडे घेतात. त्याप्रमाणे गोडजेवण करतात. लहान असेल तर वर्गातील मुलांना चॉकलेट दिले जातात.


संध्याकाळी मित्रमंडळींना फराळाला बोलवितात ज्याचा वाढदिवस असेल त्याला औक्षवण करतात. त्याच्या नावाचा केक तयार करतात. जितक्या वर्षाचा तो झाला असेल तेवढ्या मेणबत्त्या लावतात. पताका, फुगे, रंगीत दिव्यांच्या माळा वगैरे लावून घर सुशोभित करतात.


अशा रितीने हौशीने व आनंदाने हा वाढदिवस साजरा, करतात 'वयाबरोबर विचाराने मोठे व्हा' असे वाढदिवस सांगतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद