शेतकरी निबंध 10 ओळी | 10 Lines on Farmer in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शेतकरी मराठी निबंध बघणार आहोत. आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. म्हणून शेतकऱ्याला महत्व दिल्या जाते. शेतकरी फार कष्टाळू असतो. निसर्गावर त्याचे जीवन अवलंबून असते.
आपली बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर होते. पावसाच्या अनियमीतपणामुळे दुष्काळ पडतो म्हणून सरकारने नद्यांवर धरणे बांधली आहेत. ते पाणी पाटाने शेतीला पुरवले जाते.
शेतकरी शेत नांगरतो. पेरणी करतो. शेताला खतपाणी देतो. पीक तयार झाले की कापणी व मळणी करतो. शेती करून धान्य पिकविणे, शेतीची मशागत करणे हे त्याचे काम असते.
उन असो पाऊस असो त्याला काम करावेच लागते. पीक आल्यानंतर कापणी, मळणी ही कामे करावी लागतात. पाऊस पडला नाही तर त्याला दुष्काळाला तोंड द्यावे लागते. शेतकरी परिस्थितीने खूप गरीब असतो.
कष्ट करूनच तो आपले व मुलाबाळांचे पोट भरू शकतो. त्याच्या कष्टामुळेच आपल्याला अन्नधान्य मिळते. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद