कोंबडा निबंध 10 ओळी | 10 Lines on Hen in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कोंबडा मराठी निबंध बघणार आहोत. कोंबडा हा पाळीव पक्षी आहे. खेड्यातील लोक कोंबडा पाळतात. कोंबडा आकर्षक दिसतो.
त्याचा तुरा लाल असतो. त्याची चोच टोकदार असते. तो ऐटबाज चालतो. कोंबडे , पांढऱ्या, लाल रंगाचे असतात. त्याची नखे असतात.
अंगावर भरपूर पिसे असतात. त्याची शेपटी झुबकेदार असते. डोक्यावर लालभडक तुरा असतो. त्यामुळे तो सुंदर दिसतो. तो खुराड्यात राहतो.
त्याच्या ओरडण्याला आरवणे असे म्हणतात. खेड्यातील लोकांना कोंबड्याचा फार उपयोग होतो. कोंबडा आरवला की ते लोक पहाट झाली असे समजतात.
म्हणूनच कोंबड्याला गरिबांचे घड्याळ असे म्हणतात. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद