होळी मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines on Holi Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण होळी मराठी निबंध बघणार आहोत. हिंदू धर्मातील अनेक सणांपैकी होळी हा सण फार महत्वाचा सण आहे. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा होय.
होळीसाठी मोठमोठी लाकडे, झाडांच्या फांद्या इ. साहित्य आम्हीमलेआधीपासन तयार करुन ठेवतो. होळीच्या दिवशीएकमोठा खड्डा करुन त्यामध्ये होळीची लाकडे रचून उंच होळी तयार करतात.
संध्याकाळी सर्वजण होळीच्या ठिकाणी जमल्यावर होळीची पूजा करतात. व ही होळी पेटवली जाते. होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य तसेच नारळही टाकतात.
रंगपंचमीम्हणजे तर मुलांच्या आवडीचा सण आहे. या दिवशी सर्वजण एकमेकांच्या अंगावर रंगीत पाणी उडवतात व मनसोक्त रंग खेळतात.
एकमेकांच्या अंगाला रंग लावून खूपच मजा करतात. गावामध्ये होळीच्या निमित्ताने गावकरी एकत्र जमतात. ग्रामदेवतेच्या पालख्या सजवून त्यांची मिरवणूक काढतात.
प्रत्येकाने आपल्या मनातील पापे, वाईट प्रवृत्ती, दुष्टावा या सर्वांना होळीत टाकून पेटवून द्यावे व मन स्वच्छ करुन आनंदाने, प्रेमाने एकमेकांजवळ वागावे हाच या सणाचा मुख्य संदेश आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद