मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Mi pahileli jatra marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध बघणार आहोत. आमच्या रामपूर गावामध्ये पौष महिन्यात देवीचा मोठा उत्सव असतो.
ही देवी नवसाला पावणारी असल्याने आजुबाजूच्या गावातून लांब-लांबून अनेक भाविक आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात. सारा गाव अगदी गजबजून गेलेला असतो.
गावातील लोक आधीपासूनच या उत्सवाची तयारी करु लागतात. देऊळ स्वच्छ करणे, रंगरंगोटी करणे, मंडप घालणे वगैरे सर्व तयारी केली जाते. देवळाच्या समोर पेढे, प्रसाद, मिठाई, कपडे, खेळणी वगैरेची दुकाने ओळीने मांडलेली असतात.
मुलांसाठी मोठमोठे पाळणे, गोल चक्रे वगैरे खेळ असतात. तसेच माकडवाला, डोंबारी यांचे खेळ पहाण्यासाठी लोकांची गर्दी झालेली असते. पिपाण्या, बेंडबाजे, ढोलकी यांच्या आवाजाने सारा परीसर भरुन राहिलेला असतो.
मुख्य उत्सवाचे दिवशी सर्वांना महाप्रसादाचे जेवण देण्यात येते. गावकरी लोकांच्या रोजच्या कष्टमय जीवनात या उत्सवामधून आनंद मिळत असतो.
त्यामुळे गावातील लोकांना या जत्रेचे फारच अप्रपूवाटते. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद