पोस्टमन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Postman in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोस्टमन मराठी निबंध बघणार आहोत. पोस्टाच्या कार्यालयात निरनिराळया गावांचे टपाल येते. हे टपाल नेणाऱ्या माणसाला पोस्टमन म्हणतात. पोस्टमनचे काम घरोघरी पत्र नेऊन देणे असते.
त्याचा पोशाख खाकी रंगाचा असतो. तो सरकारी नोकर असतो. त्याच्या खांद्यावर टपालाने भरलेली पिशवी असते. लोकांचे पत्ते शोधत त्याला खूप चालावे लागते. उंच इमारतीत अनेक जिने चढावे लागतात.
सर्व लोक पोस्टमनची आतुरतेने वाट पहात असतात. नातेवाईकांच्या कडची व मित्रांची खुशाली आपल्याला त्याच्यामुळेच कळते. सुख आणि दुःख दोन्ही प्रकारच्या बातम्या तो आपल्यापर्यंत पोहचवितो.
पोस्टमनचे जीवन फार कष्टाचे असते. परंतु पोस्टमन जणू काही आपला मित्रच असतो. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद