संत तुकाराम वर 10 ओळी | 10 lines on sant tukaram in Marathi

 संत तुकाराम वर 10 ओळी | 10 lines on sant tukaram in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संत तुकाराम मराठी निबंध बघणार आहोत . भारतीय संत मालिकेत भक्तीमार्गाचे प्रवर्तक म्हणून संत तुकारामांचे श्रेष्ठ स्थान आहे. 


घरी दारिद्रय असताना तुकारामांनी आपल्या रसाळ अभंगाव्दारे समाजाला भक्तीमार्गाचे ज्ञान दिले. एकदा शिवाजीमहाराजांनी एका दुताबरोबर वस्त्र, अलंकार व नजराणा पाठविला. त्यावेळी तुकाराम घरी नव्हते. 


त्यांच्या पत्नीला खूप आनंद झाला. तिने ते सर्व ठेऊन घेतले. तुकारामांनी घरी आल्यावर ते सर्व परत पाठविले व दुताला म्हणाले “न्या हे सर्व परत” सोने रूपये आम्हाला काही नको. शिवबाला आमचे आशीर्वाद सांगा.


तुकारामांचे हे विरक्त वर्तन पाहून शिवाजीमहाराजांनी त्यांचे पाय धरले. तेव्हा त्यांनी शिवबाला न्यायाने राज्यकारभार करण्याची विनंती केली.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद