शाळेतील स्नेहसंमेलन निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on Shaletil snehasamelan essay

 शाळेतील स्नेहसंमेलन निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on Shaletil snehasamelan essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  शाळेतील स्नेहसंमेलन मराठी निबंध बघणार आहोत.  स्नेह संमेलन म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदाचा दिवस. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक एकत्र येतात. आपआपले विचार मांडतात.


दरवर्षी शाळेत स्नेहसंमेलन असते. त्यासाठी मोठा मंडप उभारण्यात येतो. विद्यार्थ्यांची स्नेहसंमेलनाची तयारी पंधरा दिवस आधीपासून सुरू असते. सांस्कृतिक कार्यक्रम बसविणे, .


खेळांच्या स्पर्धा घेणे वगैरे काम शाळेतील शिक्षक शिक्षिका करीत असतात. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलनाचे उद्घाटन, पाहुण्यांचे स्वागत व भाषण असा कार्यक्रम असतो.


दुसऱ्या दिवशी मनोरंजनाचे इतर कार्यक्रम व नाटक वगैरे असते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडलेले असते ते सर्वांसाठी पाहायला खुले असते.


शेवटच्या दिवशी सकाळी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम होऊन स्नेहसंमेलनाच्या समारंभाची सांगता होते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद