लोकमान्य टिळक मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Lokmanya Tilak
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकमान्य टिळक मराठी निबंध बघणार आहोत. बाळ गंगाधर टिळक हे थोरपुरूष होते. टिळक देशभक्त होते.
'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे अन् तो मी मिळविणारच' असे ते म्हणत. इंग्रजांनी त्यांचा खूप छळ केला. पण टिळकांनी देशभक्ती सोडली नाही.
त्यांनी स्वराज्यासाठी फार कष्ट केले . मंडालेच्या तुरूंगात असताना त्यांनी “गीतारहस्य” हा महान ग्रंथ लिहीला. लोकांनी त्यांना 'लोकमान्य' ही पदवी दिली.
त्यांनी 'केसरी' व 'मराठा' ही वर्तमानपत्रे चालविली. लोकजागृतीसाठी “सार्वजनिक गणेशोत्सव” व “शिवजयंती” हे उत्सव सुरू केले.
त्यांचा मृत्यु १ ऑगस्ट १९२० रोजी झाला. म्हणून १ ऑगस्टला टिळक पुण्यतिथी साजरी करतात. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद