माझा देश भारत १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on My Country India Essay in Marathi.

 माझा देश भारत १० ओळीत मराठी निबंध 10 Lines on My Country India Essay in Marathi. 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा देश भारत मराठी निबंध बघणार आहोत.  आशिया खंडातील भारत हा एक अतिप्राचीन देश आहे. 


देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत जणू काही सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठीच उभा आहे. तीनही बाजूला पसरलेला महासागर माझ्या भारताचे रक्षण करत आहे.


देशाच्या उत्तरेकडून येणाऱ्या गंगा-यमुनाया नद्यांमुळे भारतभूमी सुपीक बनली आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी अशी सर्व प्रकारची पिके येथे पिकवली जातात. देशाची औद्योगिक प्रगतीही आता झपाट्याने होत आहे.


श्रीकृष्ण, राम, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराजइ. थोर पुरुष यामातीमध्येजन्माला आले आहेत. स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाची आहुती देणारे, टिळक, सावरकर, गांधीजी इ. थोर पुरुष या देशातच निर्माण झाले.


माझ्या देशात ताजमहाल, गोल घुमट, काश्मीर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. असंख्य पर्यटक हे पहाण्यासाठी येथे येत असतात. या देशात विविध प्रांतातील सर्वजातीधर्माचेलोकएकजुटीने रहातात. 


अशा या सुजलाम्-सुफलाम्, भारतमातेवर माझे मनाणसून प्रेम आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद