प्रदूषण एक समस्या मराठी निबंध Pradushan Ek Samasya Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रदूषण एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत.वाहत्या रहदारीच्या रस्त्यातून जाताना अचानक वाहतूक ठप्प झाली. कनका जेक दाबत, पढे मागे...मोटारी धावत्या विचारपूस केल्यावर कळले की पाच-सहा मोटार चालकाकडे (PUC) पी.यू.सी.चा परवाना नसल्याने त्यांना पोलिसांनी रोखले होते.
जिथे आधीच धोक्याची पातळी वायु प्रदूषणाने ओलांडली होती, तिथे या मोटारी वातावरणात प्रचंड धूर सोडत वायू प्रदूषण वाढवित होत्या. सध्या २१ व्या शतकाकडे वाटचाल करताना मानवाच्या प्रगतीचा वारु बेलगाम चौखूर उचललाय, असं नाही वाटत.
वैज्ञानिक प्रगती, आण्विक संशोधन, अंतराळात भरारी, ग्रहगोलांवर स्वारी, नित्य नवे शोध.... नवी नवी क्षितिजे पादाक्रांत करण्याची धडपड ! निसर्गावर मात करण्याचा बालीश अट्टाहास, खोट्या अहंभावाची जोपासना करता करता मानवाला अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. भ्रष्टाचाराचा कॅन्सर, लोकसंख्येचा भस्मासूर नि प्रदूषणाचा महाभयंकर राक्षस! ... यानं ह्याचं दैनंदिन जीवन पार झाकोळून टाकल्य.
माणसाच्या आजच्या हव्यासापायी हवा, पाणी, अन, जमीन, धान्य सारं सारं प्रदूषित झालंय. औद्योगिक क्रांतीपूर्वीच पदूषणाचा जन्म झाला, परंत निसर्गाच्या कुंपणानं माणसाच्या जीवनात धुमाकूळ घालणाऱ्या या उन्मत्त दैत्याला थोपवून धरला होता. पण तो तरी कुठवर साहेल हा स्वैराचार ?
सूर्य, वायू, पाणी या समर्थ घटकांवर नैसर्गिक चक्रांवरच तर या पृथ्वीतलावरचं पर्यावरण अबाधित राहतं. पण प्रगतीच्या नावाखाली 'किती घेशील दो कराने ह्या भूमिकेतून आपण हा निसर्ग लुबाडा, ओरबाडला नी पर्यायाने प्रदूषणाने पाऊल पुढे टाकले, निर्भल जीवनासाठी निसर्गाची साथ हवी त्यासाठी काय करावे सांगताना ज्ञानोबा म्हणतात ह
नगरेचि रचावी । जलाशये निर्मात्री।
महावने लावावी । नानाविधे॥
वृक्षांना त्यांनी कर्मयोगी म्हटलं आहे. पर्यावरण रक्षणात वक्षांचा सिंहाचा वाटा! पण लोकसंख्येच्या भस्मासुराने प्रचंड वृक्षतोड केली. सिमेंटची जंगले उभी राहिली.
वातावरणातील थंडपणा नष्ट झाला. तापमान वाढू लागले. कारण प्रदूषणाने पृथ्वीभोवतालच्या ओझोन थराला छिद्र पडले. वातावरणीय थरांमधील कार्बनडायऑक्साइड अधिकाधिक तापून राहू लागला. ग्लोबल वॉर्मिंग सुरूच राहिले. दोन्ही धृव वितळू लागले, पाऊस कमी झाला, कृत्रिम पावसाच्या ढगांसाठी वारेमाप खर्च सुरू झाला.
जमीन पुरेनाशी झाल्यावर मानवाने नद्या, तळी समुद्रात भरी घातल्या त्यात इमारती, इमले उभारले. नद्यांचे प्रवाह बदलले .... मग समुद्राने निषेध नोंदविला - केरळला त्सुनामी लाटांनी शहरे गिळंकृत केली. न्यूयॉर्कला कॅतरिना व रीटा ही वादळे येऊन ठेपली.
या लोकसंख्या वाढीमळे शेतकऱ्यांनी रासायनिक खते, संकरित बी बियाणे शोधली. 'हरितक्रांती झाली. पण त्यात धान्याचा कस गेला नि जमिनीचा पोत गेला. जमीन दूषित झाली,खारवली. धान्य, भाज्या सर्वांवर कीटकनाशके फवारून अन्न अंतर्बाह्य विषारी झाले.
तुकोबाराय म्हणतात, 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.' जंतुनाशके मिश्रित अन्नसेवनाने माणसे पोखरली, नाना व्याधींनी जखडली. औषधांमुळे आयुर्मान वाढले, पण आयुष्याची प्रत खालावली. वाहनांच्या धुराने, छातीचे पिंजरे धुरकटले. फुफ्फुसे निकामी होऊ लागली. कॅन्सरसारखे रोग बळावले. पक्षाघात, हार्ट अॅटॅक २०व्या वर्षीच मुलांना येऊ लागला.
जीवघेणी स्पर्धा, मानसिक ताणतणाव, दुरावलेले नातेसंबंध, विभक्त कुटुंबसंस्था हेही सामाजिक मानसिकतेतील प्रदूषणच नव्हे काय? वाढणारी गुन्हेगारी, हास पावलेले मूल्यसंस्कार, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, अंधश्रद्धा, भोंदूगिरी बुवाबाजी ही तर युवा पिढीला लागलेली कीडच आहे.
याला उपाय आहे निर्मळ मन. चांगल्या विचारांचं मन! मनाचे प्रदूषण सर्वात घातक, सुसंगती, सुवाचन, सत्संग ह्यांची कास धरून मनाचं प्रदूषण प्रथम घालवायला हवं. मग गणेशोत्सव असला तरी आपण लाऊडस्पीकरवर कर्णकर्कश्य गाणी, सिनेमा गीते, डिस्को लावणार नाही. ज्याने कानाचे विकार निर्माण होतात.
भोपाळसारखी वायुगळती, अणुभट्टीतील स्फोट काळजीपूर्वक थांबवू शकू. Clean air act तंतोतंत पाळू. 'झाडे लावा, झाडे जगवा' अशा नुसत्याच घोषणा देणार नाही तर मोहिमा राबवू.
निसर्गसंगती सदा घडो
मंजूळ पक्षीगान कानी पडो
कलंक प्रदूषणाचा झडो
वृक्षतोड सर्वथा नावडो.
टाकाऊपासून टिकाऊकडे वाटचाल करू. मळीपासून स्पिरीट, बगॅसपासून खत, कागद, पालापाचोळ्यातून कंपोस्ट खत, मलमूत्रातून बायोगॅस इत्यादी इत्यादी. शासनही जागरूक झालंय, पण शासकीय योजना प्रदूषित' न होता प्रत्येकापर्यंत पोचल्या पाहिजेत अशी काळजी घेऊ. आशा आहे .....
आजच्या बालकांकडून! उद्याच्या नागरिकांकडून म्हणूनच ध्यास घेऊया सारे मिळूनी प्रदूषणावर मात करू। वने जगवू, सृष्टी फुलवू वृक्षांचा सन्मान करू। ५ जून...! जागतिक पर्यावरण दिन! आगळा वेगळा साजरा करू! वसुंधरेला नटवूनच! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद