शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध | Shikshanache Mahattva Marathi Nibandh

शिक्षणाचे महत्त्व  मराठी निबंध | Shikshanache Mahattva Marathi Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध बघणार आहोत. शिक्षण हा जीवनाचा आत्माच. म्हणूनच शिक्षणाला, 'जीवन-शिक्षण' व शाळेला 'जीवनशिक्षण मंदिर' म्हणतात. आपला देश खेड्यापाड्यांचा. देशाचा विकास होण्यासाठी साक्षरता महत्त्वाची. प्राथमिक शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी नेणं महत्त्वाचे. संत तुकडोजी महाराज म्हणतात,


होईल जीवनाची उन्नती। 

ज्ञानविज्ञानाची प्रगती। 

ऐसीच असावी ग्रंथसंपत्ती। 

गावोगावी।


लहानग्या बाळाचं प्राथमिक शिक्षण घरीच सुरू होतं. कुटुंब ही त्याची शाळा नि आई त्याची शिक्षिका. आईचं बोट धरून उभं राहणं, आधाराविना चालणं, बाबा, मामा सारखे सोपे शब्द उच्चारणं, हाताने जेवणं, हे सारं आई शिकवते. अगदी नकळत! पूर्वी पाच-साडेपाच वर्षांचं झाल्यावर हेच बाळ प्राथमिक शाळेत जाई, पण आता मात्र ही वयोमर्यादा अडीच-तीन वर्षांपर्यंत खाली आलीय. 


ही मुले 'प्ले ग्रुप' म्हणजे खेळकर गटात शाळेत जातात. तिथे रांगेनं बसणे, शिस्त पाळणे, डबा खाणे, बुद्धीचातुर्याचे खेळ खेळणे, कागद कापणे, चिकटवणे, मातीचे, चिखलाचे वेगवेगळे आकार उदा. भांडी, पोळपाट, साप बनवणे, मेकॅनोची यंत्र बनवणे... इत्यादी गोष्टींमध्ये रमतात.


 मुलं ही अनुकरणप्रिय असतात आणि वयाच्या आठ वर्षांपर्यंत मुलांची बौद्धिक क्षमता ही वाढत जाणारी असते, त्यामुळे ह्या वयात त्यांना आपण जे देऊ ते ती घेतात आत्मसात करतात... जसंच्या तसं. म्हणूनच प्राथमिक शिक्षकाची भूमिका आजच्या युगात फार महत्त्वाची आहे. 


शिक्षक हे अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी शिक्षणदाते असले पाहिजेत. प्राथमिक शिक्षणाच्या रुपाने जो पाया घातला जात आहे. त्यावरच माध्यमिक व उच्च शिक्षणाचा डोलारा अवलंबून आहे. म्हणतात ना,When barber makes a mistake, it will be a new style But when teacher makes a mistake, it will be a new crime!


ती देणं शिक्षकांच आद्यकर्तव्यच आहे. कारण मोठी झाल्यावर हीच मुले समाज सावरणार आहेत. आंबेडकरांच्या मते, 'उपासमारीने शरीराचे पोषण कमी होऊन माणूस अल्पायुषी होतो, पण शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास, जिवंतपणीच दसऱ्याचा गुलाम होतो' 


गुलामगिरीला पोषक ठरणारा समाज आपल्याला नक्कीच नको आहे. शासनही त्या दृष्टीने जोरकस पावले उचलत आहे. प्राथमिक शिक्षण हे सर्वांना मोफत केले जाणार आहे. त्यात संगणकशास्त्र व अॅबॅकस शिक्षणाचा ही अंतर्भाव करण्याचा शासनाचा मानस आहे.


भारतातील गरीबी, त्या पाठोपाठ येणारे कुपोषण, बालमजुरी टाळण्यासाठी राज्यशासन प्राथमिक शाळेतील मुलांना तांदूळ खिचडी, गूळ व दाण्याची चिक्की, भाज्या घातलेला भात दररोज देऊ करते आहे. मधल्या वेळेच्या खाण्याची समस्या सोडवते आहे. वह्या, पुस्तके, गणवेश मोफत वा अत्यल्प दरात मिळवून देते. 


आपले सर्वांचेही त्यामुळे कर्तव्य आहे की, जास्तीत जास्त मुलांना, तळागाळातल्या, आदिवासी मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवृत्त करणे, त्यांचे बोट धरून त्यांना शाळेची वाट दाखवणे. शिक्षणाचा अर्थच मुळी कणाकणाने नि क्षणाक्षणाला शिकणे. ज्ञानकण गोळा करणे. 


फुलाफुलामधील मध, मधमाशीने गोळा करावा, तसा शिकण्याची प्रक्रिया जन्माबरोबर सुरू होते नी मुत्यूनंतरच थांबते. म्हणूनच...  ध्यास घेऊनि माणुसकीचा पाय चालती पुढे पुढे शिकूनी सारे सुजाण व्हावे यासाठी अभियान उभे अक्षर ओळख तिसरा डोळा उघडूनि पाहू जगाकडे रात संपली पहाट झाली उजेड नांदो चोहीकडे हे अभियान गीत गात गात चला तर .... कामाला लागूयात!मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद